Goa Weather Update : येत्या 3 ते 4 तासांत गोव्यातील काही भागात पावसाची शक्यता

गोवा हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे
Goa Weather Update | Goa Rain Updates
Goa Weather Update | Goa Rain UpdatesDainik Gomantak

पुढील 3 ते 4 तासांत उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांतील अनेक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाउस पडण्याची शक्यता गोवा हवामान विभागाने वर्तविली आहे. याबाबतची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.

दरम्यान, मॉन्सून अखेर गुरुवारी केरळात दाखल झाला. मॉन्सूनची ही स्थिती पाहता राज्यात 12 किंवा 13 जूनला मॉन्सून दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने व्यक्त केली होती.

बिपरजॉय वादळामुळे मॉन्सूनवर परिणाम झाला आहे. एरवी, एक जूनला मॉन्सून केरळमध्ये दाखल होतो, पण यंदा दीर्घकालीन सरासरीच्या सात दिवस उशिराने मॉन्सून केरळमध्ये पोचला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com