‘तो’ समाजसेवक मार खाता खाता चुकला

पोलिसांनी त्वरित मध्यस्थी करून प्रकरण मिटवले.
Crime Vasco

Crime Vasco

Dainik Gomantak

वास्को: लैंगिक अत्याचार प्रकरणातील महिलेची सोशल मीडियावर बदनामी करणारा मुरगावातील एक तथाकथित समाजसेवक महिलेकडून चप्पलाचा मार पडता पडता चुकला, अशी चर्चा सध्या वास्कोत (Vasco) सुरू आहे.

Crime Vasco

खूनप्रकरणी अस्लम खानला 2 दिवसांची पोलिस कोठडी

मंगळवारी (28) या प्रकरणातील महिलेने मुरगाव पोलीस स्थानकात येऊन आपल्या तक्रारीविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी पोलिसांनी (Police) त्या महिलेसह तिचे वकील आणि बिगर सरकारी संस्थेच्या सहकाऱ्यांसोबत संशयित आरोपींनी तिला ज्या ठिकाणी ठेवले होते, त्या जागेची पाहणी केली. यावेळी त्या महिलेने काँग्रेस नेते व इतरांनी तिला ज्या वसतिगृहात ठेवले होते, ते ठिकाण दाखवले.

Crime Vasco

'सरकारने खाणी सुरू कराव्यात, कोविड योद्ध्यांना नोकऱ्यांसाठी प्राधान्य द्यावे'

ही महिला बुधवारी (29) पुन्हा मुरगाव पोलीस स्थानकावर आली असता, त्या महिलेची सोशल मीडियावर (Social Media) बदनामी करणारा एक तथाकथित समाजसेवक तेथे तिला दिसून आला. महिलेने त्या समाजसेवकाला त्वरित ओळखले आणि संतापाने त्याच्या दिशेने चप्पल भिरकावून मारल्याची चर्चा सध्या सडा, बोगदा भागात आहे. यावेळी पोलिसांनी त्वरित मध्यस्थी करून प्रकरण मिटवले. त्या समाजसेवकाने सोशल मीडियावर आपली बदनामी करणारे व्हिडिओ प्रसिद्ध केल्याची तक्रार पोलिसांत करणार असल्याचे त्या महिलेने सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com