'सरकारने खाणी सुरू कराव्यात, कोविड योद्ध्यांना नोकऱ्यांसाठी प्राधान्य द्यावे'

दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन (Francisco Sardinha) यांनी काल पत्रकार परिषदेत घेऊन या मागण्या केल्या.
Francisco Sardinha

Francisco Sardinha

Dainik Gomantak 

सासष्टी: तीन महिन्यांत खाणी सुरू केल्या जातील, असे राज्य सरकारने जाहीर केले होते. सात ते आठ खाणींच्या भाडेपट्टीचा लिलाव करण्याचेही ठरले होते. मात्र, अजून सरकारला मुहूर्त सापडलेला नाही. हजारो खाण कामगार या उद्योगावर अवलंबून आहेत. त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. सरकारने लवकर खाणी सुरू कराव्यात, अशी मागणी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन (Francisco Sardinha) यांनी काल पत्रकार परिषदेत केली.

<div class="paragraphs"><p>Francisco Sardinha</p></div>
खूनप्रकरणी अस्लम खानला 2 दिवसांची पोलिस कोठडी

गेले कित्येक दिवस अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या शक्य आहेत, त्या मागण्या मान्य कराव्यात. त्यांच्याशी चर्चा करावी, असे आवाहनही सार्दिन यांनी केले आहे. कोविड-19 (COVID-19) महामारीच्या काळात कित्येक परिचारिका, मल्टी टास्किंग कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. मात्र, अजूनही कित्येक कोविड योद्धे सरकारी मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने सध्या सरकारी नोकऱ्या (Government Jobs) वाटण्याचा सपाटाच लावला आहे. नवीन लोकांची भरती करण्यापेक्षा या कोवि़ड योद्ध्यांना (Covid Warriors) नोकऱ्यांसाठी प्राधान्य द्यावे. मी मुख्यमंत्री असताना पाचपेक्षा जास्त वर्षे नोकरीत असलेल्यांना कायम केले होते, असे उदाहरणही सार्दिन यांनी सांगितले.

गोव्यात फोन कनेक्टिविटीसाठी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. सोनसोडोवरील कचरा समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणीही सार्दिन यांनी केली आहे.

<div class="paragraphs"><p>Francisco Sardinha</p></div>
गोवा पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात 'गुंडगिरी' वाढल्याचा आरोप!

तृणमूल, ‘आप’ने स्वत:च्या राज्यात डोकावून पाहावे

तृणमूल (TMC) व ‘आप’ने (AAP) गोव्यात येऊन पोकळ आश्र्वासने देऊ नयेत. त्यांनी प्रथम त्यांच्या राज्यात कचराप्रश्र्नी काय सोय केली, ते स्पष्ट करावे अशी टीका सार्दिन यांनी केली. कुडतरी मतदारसंघात आपल्या मुलाला कॉंग्रेसने उमेदवारी दिली तर ते फॅमिलीराज फॉर्मुल्यात बसत नाही. कारण मी दिल्लीत खासदार आहे, तर मुलगा विधानसभासाठी निवडणूक लढवणार आहे, असेही सार्दिन म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com