Ganesh Chaturthi 2024: ‘हरित चतुर्थी’ साजरी करा! पीओपीच्‍या मूर्ती, प्‍लास्‍टिक वापर टाळा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Ganeshotsav 2024: पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून प्रत्येक गोमंतकीयाने पावले उचलली पाहिजेत असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले
Ganeshotsav 2024: पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून प्रत्येक गोमंतकीयाने पावले उचलली पाहिजेत असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले
Pramod Sawant| Ganesh IdolCanva
Published on
Updated on

CM Pramod Sawant

पणजी: राज्यात पारंपरिकपणे गणेशोत्सव साजरा होतो. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणून स्थापना करू नये. चिकणमातीच्या मूर्तींचे पूजन करावे. तसेच सजावटीसाठी प्लास्टिक फुलांच्या माळांचा वापर टाळावा आणि यंदाची गणेश चतुर्थी ही ‘हरित चतुर्थी’ म्हणून साजरी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समस्‍त गोमंतकीयांना केले आहे.

गोमंतकीयांचा आवडता व सर्वांत मोठा गणेशोत्‍सव सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्‍यानिमित्त मुख्यमंत्री सावंत यांनी एक व्हिडिओ समाजमाध्यमांतून व्हायरल केला आहे. त्या व्हिडिओद्वारे त्यांनी राज्यातील व देशातील सर्व जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय गोव्यातील तमाम जनतेला त्यांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्‍याचे आवाहन केले आहे.

चतुर्थीची माटोळीसुद्धा पारंपरिक असावी. रानातील फळे-फुले आणून ती तयार करावी. सध्या प्लास्टिकच्या वस्तू वापरण्याचा ट्रेंड आला आहे. पण या प्लास्टिक वस्तू माटोळीला बांधू नयेत.

शिवाय बाजारात प्लास्टिकच्या फुलांचा माळा उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करणे टाळावा, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

गणेश चतुर्थीसाठी यापूर्वी घरोघरी फराळाच्या वस्तू बनविल्या जात असत. पण आता फराळाच्या वस्तूही बाहेरून आणण्याचा ट्रेंड आला आहे. पण लोकांनी विशेषत: महिलांनी हा लागणारा फराळही घरीच तयार करावा. जर तो घरी करणे शक्‍य नसेल तर फराळ व माटोळीचा बाजार ‘स्वयंपूर्ण ई बाजार’वर उपलब्ध आहे. तेथून खरेदी करावी. पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून प्रत्येक गोमंतकीयाने पावले उचलली पाहिजेत, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

Ganeshotsav 2024: पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून प्रत्येक गोमंतकीयाने पावले उचलली पाहिजेत असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले
Ganesh Chaturthi 2024: गोव्यात पोर्तुगीजपूर्व काळात गणेश चतुर्थी कशी साजरी केली जायची? गणपती मंदिरं, भातशेतीचा संबंध वाचा

निर्माल्‍य पाण्‍यात फेकू नका, झाडांच्‍या मुळांवर घाला

या चतुर्थीपासून आम्‍ही स्वयंपूर्णतेकडे वळुया. उत्सवातील निर्माल्य नदी किंवा तलावात टाकले जाते, ते टाकू नये. त्यामुळे दूषित होणाऱ्या पाण्याचा विपरित परिणाम जलचरांवर होतो. हे निर्माल्य व इतर कचरा झाडांच्या मुळात घालावा, जेणेकरून झाडांना खत मिळेल. गोवा स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे,

असे आवाहन मुख्‍यमंत्र्यांनी केले. सरकार प्रत्येकवेळी कायदे करते, विविध अधिसूचना काढते. पण त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमची असल्याचे सावंत यांनी नमूद केले.

गणेश चतुर्थी हा गोमंतकीयांचा आनंदाचा उत्सव. मात्र तो साजरा करताना ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्‍या मूर्तींचा वापर टाळावा. विक्रेतेही अशा मूर्तींची विक्री करणार नाहीत. सर्वांनी चिकणमातीच्या मूर्तीचे पूजन करावे.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com