सायबर फसवणुकीचे मोठे सिंडिकेट उद्ध्वस्त! 77 कोटींच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश, 16 जणांच्‍या आवळल्‍या मुसक्‍या; गोव्‍यातून नऊजण ताब्‍यात

9 Arrested From Goa Cyber Crime: देशभरातील आर्थिक सायबर गुन्ह्यांविरुद्ध मोठी कारवाई करत गुजरातच्या सायबर सेंटर ऑफ एक्सलन्सने एका आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
9 Arrested From Goa Cyber Crime
Goa Cyber CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: देशभरातील आर्थिक सायबर गुन्ह्यांविरुद्ध मोठी कारवाई करत गुजरातच्या सायबर सेंटर ऑफ एक्सलन्सने एका आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

‘म्यूल अकाउंट’ चालवणाऱ्या या टोळीतील १६ संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी नऊजणांना गोव्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. या रॅकेटने तब्बल ७७ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गैरव्यवहार केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिस उपनिरीक्षक के. बी. देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बडोदा, पालनपूर आणि गोवा येथे एकाच वेळी छापे टाकून ही कारवाई केली. या कारवाईत मुख्य सूत्रधार किरण जोशी आणि जितू ठक्कर यांच्यासह एकूण १६ जणांना अटक करण्यात आली. आलेल्यांपैकी पाचजण बडोदा येथून, दोन पालनपूर आणि सर्वाधिक नऊ गोव्यातून पकडले गेले आहेत.

9 Arrested From Goa Cyber Crime
Goa Cyber Crime: 'डिजिटल अरेस्ट'चा सापळा भेदला, मॅजिस्ट्रेटचे खोटे सोंग उघड; साताऱ्यात संशयित जेरबंद

दुबईतील सायबर गुन्हेगारांशी संबंध असल्‍याचे उघड झाले आहे. तपासादरम्यान १९३० हेल्पलाईन पोर्टलवरील माहितीनुसार, या सिंडिकेटचा संबंध देशभरातील किमान ३७५ सायबर तक्रारींशी असल्याचे समोर आले आहे. ‘डिजिटल अरेस्ट’, गुंतवणूक फसवणूक आणि गेमिंग स्कॅमद्वारे लुटलेला पैसा सुरक्षितपणे वळवण्यासाठी ही टोळी बँकिंग सुविधा पुरवत होती. संशयित आरोपींनी स्वतःच्या तसेच इतरांच्या नावे २६० हून अधिक बँक खाती उघडून त्याद्वारे फसवणुकीची रक्कम फिरवली. व्यवहार संशयास्पद वाटू नयेत म्हणून तीन बनावट (शेल) कंपन्या स्थापन करून कोट्यवधींचे व्यवहार कायदेशीर असल्याचे भासवले जात होते.

9 Arrested From Goa Cyber Crime
Goa Crime: टँकर चालकावर जुन्या मालकाकडून खुनी हल्ला! पणजीतील प्रकार; संशयित समीर खानला अटक

१२६ सीमकार्डे, १५ लॅपटॉप जप्त

या कारवाईत केवळ गोव्यातूनच १२६ सीमकार्डे, ११५ डेबिट कार्डे, ८० बँक पासबुक्‍स आणि ७२ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. शिवाय १५ लॅपटॉप आणि अनेक राऊटर्सही हस्तगत करण्यात आले. या उपकरणांमधून बँकिंग लॉगिन माहिती, व्यवहारांचे तपशील तसेच सायबर फसवणुकीशी संबंधित महत्त्वाचा डेटा पोलिसांच्या हाती लागला आहे.

9 Arrested From Goa Cyber Crime
Goa Crime: गिरी येथील महिलेची 2.23 लाखांची फसवणूक; साळगाव पोलिसांत गुन्हा दाखल

म्यूल अकाउंट म्हणजे काय?

म्यूल अकाउंट म्हणजे असे बँक खाते जे फसवणूक किंवा बेकायदेशीर व्यवहारांसाठी वापरले जाते, पण तो खातेधारक प्रत्यक्ष गुन्हेगार नसतो. तो मध्यस्थ म्हणून वापरला जातो. एखाद्या व्यक्तीला (कधी नकळत, कधी पैशांच्या लालसेने) त्याचे बँक खाते वापरू दिले जाते, त्या अकाउंटमधून व्‍यवहार केला जातो.

9 Arrested From Goa Cyber Crime
Goa Crime: किळसवाणा प्रकार! पोटच्या मुलीवर केला लैंगिक अत्याचार; गोवा खंडपीठाचा नराधम बापाला दणका, उलटतपासणीचा अर्ज फेटाळला

दुसरीकडे, करमळी येथे एका बंगल्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर कॉल सेंटरवर सायबर गुन्हे पोलिसांनी छापा टाकून सातजणांना अटक केली. जय आचार्य (मुंबई), योगेश माळी, ऋषभ शाह, आशुतोष प्रताप, ठक्कर भरभाई (गुजरात), ऍड्रियन मारियासेवन (मुंबई) आणि नीलेश सिंग (नागपूर) अशी त्‍यांची नावे आहेत. या कारवाईत २३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित ‘पे-डे’ नावाच्या कर्ज देणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून अमेरिकेतील नागरिकांना लक्ष्य करत होते. तातडीने कर्ज देण्याचे आमिष दाखवून विविध शुल्काच्या नावाखाली सेफोरा, मेसीज, ॲपल, रेझर गोल्ड, एक्स बॉक्स यांसारखी महागडी गिफ्ट कार्ड्स उकळून फसवणूक केली जायची.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com