Goa Accident: इनोव्हा चालकाचा हलगर्जीपणा अन् दोन कारला जोरदार धडक; गिरी हायवेवर भीषण अपघातात प्रवासी थोडक्यात बचावले

Guirim Highway Accident: गिरी महामार्गावर 'रॉंग साईड' अर्थात विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याच्या हलगर्जीपणामुळे एक भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली.
Guirim Highway Accident
Guirim Highway AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गिरी महामार्गावर 'रॉंग साईड' अर्थात विरुद्ध दिशेने वाहन चालवण्याच्या हलगर्जीपणामुळे एक भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली. एका इनोव्हा कार चालकाने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून चुकीच्या लेनमध्ये प्रवेश केल्याने समोरुन येणाऱ्या दोन गाड्यांना जोराची धडक दिली. या विचित्र अपघातात तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुदैवाने सर्व प्रवासी किरकोळ दुखापतींवर बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर इनोव्हा कार वेगाने चुकीच्या लेनमधून जात होती. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या एका सेलेरिओ आणि वॅगनआर कारला या इनोव्हाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तिन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. महामार्गावर अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

Guirim Highway Accident
Goa Leopard Accident: ..अचानक बिबट्या आला धावत, दुचाकीला दिली धडक, चालक कोसळला जमिनीवर Watch Video

प्रवासी थोडक्यात बचावले

या अपघातातील (Accident) सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, तिन्ही गाड्यांमधील प्रवास सुखरुप आहेत. एअरबॅग्ज आणि सीटबेल्टमुळे प्रवाशांचे प्राण वाचले असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मात्र, वाहनांचे आर्थिक नुकसान खूप जास्त झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि इतर वाहनधारकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.

चालकाची वैद्यकीय तपासणी

अपघातास कारणीभूत ठरलेल्या इनोव्हा कार चालकाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असून अपघातावेळी तो नशेत होता का किंवा त्याला अचानक काही त्रास झाला होता का, याची खात्री करण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. पोलीस (Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत असून चालकावर वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकारणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Guirim Highway Accident
Goa Politics: 'राज्यात हुकूमशाही कारभार सुरु'! LOP आलेमाव यांचे टीकास्त्र; हडफडे प्रकरणाचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी

वाहतुकीचा खोळंबा

महामार्गावर एकामागून एक तीन वाहने एकमेकांना धडकल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन बाजूला हटवली आणि वाहतूक सुरळीत केली. महामार्गावर वारंवार होणाऱ्या 'रॉंग साईड' ड्रायव्हिंगमुळे अशा अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले असून पोलिसांनी अशा बेशिस्त चालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com