Goa Politics: 'राज्यात हुकूमशाही कारभार सुरु'! LOP आलेमाव यांचे टीकास्त्र; हडफडे प्रकरणाचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी

Yuri Alemao: जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी केलेला तपासणी अहवाल सार्वजनिक करण्याची गरज आहे. सरकारची ती जबाबदारी आहे, असे मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केले.
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन' नाईट क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा जीव गेला, त्यानंतर सरकारने नेमलेल्या न्यायदंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी केलेला तपासणी अहवाल सार्वजनिक करण्याची गरज आहे. सरकारची ती जबाबदारी आहे, असे मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केले.

विधानसभेतील आपल्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, एक आठवड्यानंतर विधानसभेचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाविषयी विधानसभा कामकाज सल्लागार समितीची (बीएसी) बैठक होईल, त्यात विरोधी आमदारांकडून आपापल्या भूमिका मांडल्या जातील.

Yuri Alemao
Goa Nightclub Fire: सगळंच बेकायदेशीर! बर्च क्लबची जागा होती वस्तीसाठीचा 'सेटलमेंट झोन'; मिठागराचा भाग CRZ मध्ये, प्रशासनाला धक्का

याशिवाय भाजप सरकारच्या काळात राज्यात निर्माण झालेली स्थिती, तसेच पर्यावरणाची हानी, महागाई, बेरोजगारी, वाढता गुन्हा, खून आणि भ्रष्टाचार हे मुद्दे उपस्थित केले जातील. ते पुढे म्हणाले, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई गोव्याबाहेर आहेत, ते आल्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांची आणि बीएसीची बैठक होईल.

Yuri Alemao
Goa Nightclub Fire: हडफडेचे पदच्युत सरपंच, सचिवांची पोलिसांच्या हातावर तुरी! जामीन फेटाळल्यानंतर भूमिगत; हायकोर्टात जाण्याची शक्यता

राज्य सरकारची सर्व क्षेत्रात दादागिरी सुरू आहे, कामकाज हुकूमशहाप्रमाणे चालले आहे. सरकार धोरण जाहीर करतात पण ते राबविले जात नाही. धोरण राबविण्यात सरकारला व्यंगत्व आले आहे, असा आरोप करीत आलेमाव म्हणाले, सरकारकडून जी आश्वासने दिली होती, ती अजूनही तशीच आहेत. राज्यपालांच्या भाषणानंतर होणाऱ्या विधानसभेच्या कामकाजाविषयी बीएसीच्या बैठकीत निर्णय होतील, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com