Multiple Taxi Owners Face GST Scrutiny from Government
पणजी: पर्यटक टॅक्सीमालकांनी आपल्या मागण्यांसाठी पेडणे येथे आंदोलन केल्यापासून सरकारने त्यांचा छळ सुरू केला आहे, असा आरोप होऊ लागला आहे. ज्यांच्याकडे चारपेक्षा अधिक टॅक्सी आहेत, त्यांना जीएसटी नोटीस जारी करण्यात आली आहे. गोमंतकीयांचा टॅक्सीव्यवसाय संपविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप ते करू लागले आहेत.
प्रस्तुत प्रतिनिधीने टॅक्सीव्यावसायिक आणि अन्य संबंधितांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गोवा माईल्स जीएसटी भरत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. आता त्यांना गोमंतकीय टॅक्सीचालकांना त्रास द्यायचा आहे. त्यासाठी ‘नोटीस’ हे शस्त्र वापरले जात आहे. व्यवसाय २० लाखांपेक्षा अधिक असेल तरच जीएसटी भरावी लागते. परंतु टॅक्सीचालक एवढे पैसे कमावत नाहीत. त्यामुळे त्यांना जीएसटी भरण्याची गरज नाही.
सरकारने जारी केलेल्या नोटिशींना उत्तर देण्यासाठी टॅक्सीमालकांना ‘सीए’कडे जावे लागते. तिथे २० हजारांपेक्षा जास्त खर्च झाला. टॅक्सीमालकांना त्रास देण्यासाठीच सरकारचे हे कारस्थान आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
जीएसटी नोंदणी न केल्यामुळे सुमारे अडीचशे पर्यटक टॅक्सीमालकांना व्यापारी कर विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. चारपेक्षा अधिक टॅक्सी असलेल्यांचा त्यात समावेश आहे. नोटिसा बजावण्याची प्रक्रिया तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे १४ टॅक्सी असलेला एकच मालक विभागाकडे समोर आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.