Mopa Taxi Counter : निर्णय लादण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर येऊन आंदोलन करणार; असोसिएशनचा सरकारला इशारा

असोसिएशनतर्फे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
Mopa Taxi Counter
Mopa Taxi CounterDainik Gomantak
Published on
Updated on

मोपा विमानतळावर टॅक्सी काउंटर देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत आमदार व दुसऱ्या एका टॅक्सी संघटनेचे नेते सुदीप ताम्हणकर यांच्यामध्ये बैठक होऊन घेतलेला निर्णय आमच्यावर अन्यायकारक असून आम्हाला तो मान्य नाही.

विश्वासात न घेता कुठलेही निर्णय लादण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्याविरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन करणार, असे ग्रीनफिल्ड मोपा एअरपोर्ट टॅक्सी असोसिएशनतर्फे उपजिल्हाधिकारी वायंगणकर यांना निवेदन सादर केल्यानंतर सांगण्यात आले.

Mopa Taxi Counter
Goa News : योगींच्या ‘बुलडोझर’ची गोव्यातही गरज; महापालिकेने मागितला अहवाल

ॲड. प्रसाद शहापूरकर म्हणाले की, चार महिन्यांपूर्वी आम्ही मोपा विमानतळावर टॅक्सी काउंटरसाठी आंदोलन केले होते. तेव्हा उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी तुमची मागणी मान्य होणार म्हणून आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली तर आमदार प्रवीण आर्लेकर हे याप्रकरणी आम्हाला मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन गेले.

त्यानंतर हल्लीच मुख्यमंत्र्यांसोबत आमदार आर्लेकर व सुदीप ताम्हणकर यांची बैठक झाली. त्यातील निर्णय आम्हाला मान्य नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com