Goa Green Power: गोव्यात 150 MW ऊर्जा निर्मिती गरजेची, PM Surya Ghar योजना गावागावांत जावी; वीजमंत्री ढवळीकर

Green energy target in Goa: मागील १५ वर्षांत गोव्यात हरित ऊर्जा (ग्रीन पॉवर) निर्मितीच्या क्षेत्रात विशेष प्रगती झालेली नाही.
Green Power in Goa, Sudin Dhavalikar
Green Power in Goa, Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

Green Energy Development in Goa

पणजी: मागील १५ वर्षांत गोव्यात हरित ऊर्जा (ग्रीन पॉवर) निर्मितीच्या क्षेत्रात विशेष प्रगती झालेली नाही. १५० मेगावॅट ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, मात्र अद्याप ते साध्य झालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत ५०० गिगावॅट हरित ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले असल्याने आता हा टप्पा ओलांडणे आवश्यक आहे, असे वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते "ग्रिड कनेक्टेड रूफटॉप सोलर सिस्टम" या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्‍घाटन पणजीत करण्यात आले. राष्ट्रीय वीज प्रशिक्षण संस्थेच्यावतीने वीज विभागाच्या अभियंत्यांसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मुख्य विद्युत अभियंता स्टीफन फर्नांडिस, प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ. त्रिपुरा ठाकूर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

Green Power in Goa, Sudin Dhavalikar
PM Surya Ghar Yojana 2024 : गोव्यात 'ग्रीन पॉवर'ला अच्छे दिन; 300 घरांना छतावर सौर पॅनेलसाठी मंजुरी

पीएम सूर्य घर: मुक्त वीज योजना गावागावांत पोहचावी, हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळे ही योजना समजून घेण्यासाठी व तिला प्रभावीपणे राबवण्यासाठी अभियंत्यांना सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे. योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्याची पुढील प्रक्रिया कशी असेल? प्रत्यक्ष पाहणी कशी केली जाते?

त्यानंतर अहवाल कसा तयार केला जातो? ही योजना नागरिकांपर्यंत प्रत्यक्षात कशी पोहोचवली जाते? या संपूर्ण प्रक्रियेचे सखोल प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले जाणार आहे, असे वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

Green Power in Goa, Sudin Dhavalikar
PM Surya Ghar Yojana: मोफत सोलर पॅनल बसवा, वीज बिल विसरा; गोव्याच्या वीज मंत्र्यांनी सांगितलेल्या योजनेचा लाभ कसा घ्याल?

हरित ऊर्जेकडे वाटचाल

राज्यात ग्रीन पॉवर निर्मितीला गती देण्यासाठी आणि सौरऊर्जा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अशा प्रशिक्षण कार्यशाळा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. गोवा हे राज्य हरित ऊर्जेच्या दिशेने सक्षम पाऊल टाकेल, असा विश्वास वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com