प्रधानमंत्री सूर्य घर; मोफत वीज योजनेअंतर्गत ग्रीन पॉवर अर्थात हरित ऊर्जा निर्माण करण्यासाठी राज्यातील 300 हून अधिक घरांना छतावरील सौर पॅनेल अर्थात RTS ( Rooftop solar system) लवकरच बसवले याणार आहे.
या योजनेसाठी नोंदणी केलेल्या 9,000 हून अधिकपैकी केवळ 379 अर्ज पात्र ठरवण्यात आलेत. सध्याच्या घडील 59 घरात ही प्रणाली कार्यरत असून त्यातून जवळपास 500 किलोवॅट ऊर्जा निर्मिती होते.
सध्या घरगुती ग्राहक 10 MWp (मेगावॅट पीक) युनिट निर्माण करतो, खाजगी ग्राहक 13 MWp तर औद्योगीक ग्राहक 33 MWp तर इतर 1.4 MWp हरितऊर्जा निर्माण करतो.
शासकीय इमारतींवर सोलर प्लॅन्ट बसवण्यासंदर्भात तसेच शासकीय जमिनींवर असे पॅनेल बसवण्यासाठी शासनाने या प्रणालीचा तपशीलाने अभ्यास करून एक अहवाल तयार केला आहे.
'386 शासकीय इमारतींवर अंदाजे 41 MWp क्षमतेचे RTS प्लॅन्ट्स बसवता येऊ शकतात तसेच 458.70 क्षमतेचे पॅनेल्स शासकीय भूभागावरती बसवले जाऊ शकतात' अशी माहिती एका उच्च अधिकाऱ्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे.
देशभरातील रहिवासी क्षेत्रामध्ये 1 कोटी आरटीएस इंस्टॉलेशन्स पूर्ण करण्यासाठी आणि दरमहा 300 युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या 01 कोटी कुटुंबांना मोफत/कमी किमतीत वीज उपलब्ध करून देण्यास मदत करण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे.
1,000 अब्ज युनिट्सची पुनर्वापरास सक्षम वीज निर्मिती करणे ज्यामुळे छतावरील सौर प्रकल्पांसाठी 25 वर्षांच्या कालावधीमध्ये 720 दशलक्ष टन CO2 इतके उत्सर्जन कमी होईल आणि त्यासाठी आवश्यक तंत्रप्रणाली विकसित करणे, रूफटॉप सोलर प्रकल्प, नियामक समर्थन, उत्पादन सुविधा, पुरवठा साखळी, विक्रेत्यांचे जाळे, ऑपरेशन आणि देखभाल या सुविधा मार्गदर्शक तत्वात नमूद केलेल्या आहेत.
SJVN ग्रीन एनर्जी लिमिटेड (SGEL), या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग संस्थेने (PSU) राज्यात चार सौर प्रकल्प उभारून 190 mw वीज निर्मितीसाठी 1,300 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला आहे. PSU कडून 3.8 - 4.3 रुपये प्रति kWh दराने वीज खरेदी करावी लागेल, असे प्रस्तावात नमूद केले आहे.
साळावली, आमठाणे, अंजुणे आणि चापोली धरणांवर ही यंत्रणा उभी केली जाईल. 2021 मध्ये राज्य सरकारने राज्यातील चार धरणांवर फ्लोटिंग सोलर पॉवर प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आणि या ठिकाणी ग्रिड-कनेक्टेड फ्लोटिंग सोलर पॉवर प्लांट उभारण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (Eol) आमंत्रित केले. हा प्लॅन्ट चार धरणांवर 25 वर्षांसाठी डिझाइन, बिल्ट, फायनान्स आणि ऑपरेट मॉडेलवर उभारला जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.