गोवा पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात 'गुंडगिरी' वाढल्याचा आरोप!

कळंगुट राडा : गजेंद्र सिंगसह पाच जण ताब्यात
Calangute Beach Case

Calangute Beach Case

Dainik Gomantak

Published on
Updated on

Calangute Beach Case: मंगळवारी रात्री कळंगुट येथील सोझा-लोबो रेस्टॉरंटवर 60 जणांच्या टोळक्यांनी केला होता. या प्रकरणी छोटू उर्फ गजेंद्र सिंग या परप्रांतीय हॉटेल व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली. तसेच सुनील राठोड, राहुल राठोड यांच्यासह पाच संशयित गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अजूनही काहींची चौकशी केली जाणार असल्याची माहिती निरीक्षक रापोझ यांनी दिली.

<div class="paragraphs"><p>Calangute Beach Case</p></div>
गृहलक्ष्मी आधार योजनेला मडगावात महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद !

अधिक असे की, कळंगुट किनाऱ्यावर (calangute beach) सोझ लोबो बार एन्ड रेस्टॉरंट आहे. येथे मंगळवारी रात्री 60 जणांच्या टोळक्याने बंदुका, लोखंडी गज, तलवारी तसेच कोयत्याने हल्ला केला. यावेळी तीन कामगारांना जबर मारहाण केली गेली. जखमी झालेल्या तिघांवर बांबोळीच्या गोमेकॉत (GMC) उपचार सुरु आहेत. बुधवारी सकाळी पोलिस उप महानिरीक्षक परमादित्य यांनी घटनास्थळी भेट दिली. हल्ल्यात सहभागी गुन्हेगारांचा सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोध घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. रेस्टॉरंटमधील या राड्याची सर्वत्र चर्चा झाली .

तिसऱ्यांदा हल्ला

स्थानिक सोझा लोबो या गोमंतकीय कुटुंबावर वर्षभरात तीनवेळा भ्याड हल्ला करण्यात आला आहे. व्यावसायिक पूर्ववैमन्यस्यातून राजीव अरोरा यांच्याकडून छोटू नामक परप्रांतीय हॉटेल (Hotel) व्यवसायिक तसेच त्यांच्या भाडोत्री गुंडामार्फत हा सुनियोजित हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. याआधी अरोरा आणि त्यांच्या गुंडाकडून दोनवेळा भ्याड हल्ला करण्यात आल्याची माहिती लोबो कुटुंबीयांनी दिली.

<div class="paragraphs"><p>Calangute Beach Case</p></div>
स्वातंत्र्य सैनिक शरदताई गुडे यांचे निधन

घटनेचा निषेध

कळंगुटचे माजी आमदार आग्नेलो फर्नाडीस तसेच माजी सरपंच एन्थॉनी मिनेझीस यांनी घटनेचा निषेध केला. हा भ्याड हल्ला पाहता राज्यातील कायदा तसेच सुव्यवस्था पुर्णपणे ढासळली असल्याचे दिसून येते. येत्या 31 डिसेंबरपर्यत या हल्ल्यातील संशयितांना गजाआड करुन सोझा लोबो कुटुंबियांना न्याय न दिल्यास मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्याचा गंभीर इशारा यावेळी आग्नेलो फर्नाडीस यांनी सरकारला दिला आहे. तसेच आपचे नेते सुदेश मयेंकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय बर्डे यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करून संशयितांना तत्काळ गजाआड करण्याची मागणी त्यांनी केली.

नालास्को रापोझही जबाबदार

कळंगुटात यापुढे कुठल्याही परिस्थितीत डान्स बारला परवानगी न देण्याची मागणी फर्नाडीस यांनी केली. स्थानिक राजकारण्यांचे पाठबळ आणि पोलिस (Goa Police) निरिक्षक नोलास्को रापोझ यांच्या हलगर्जीपणामुळेच लोबो कुटुंबीयांवर सतत हल्ले होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर गोमंतकीय माणसाची त्याच्या स्वत:च्या भूमीतच अशा प्रकारे परवड होत असताना राज्य सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. लवकरच जनता सरकारला त्याची योग्य जागा दाखवून देणार असल्याचे माजी सरपंच एन्थॉनी मिनेझीस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com