

पणजी, ता. १० (प्रतिनिधी): पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते. यावेळी माजी खासदार नरेंद्र सावईकर, दयानंद कारबोटकर आणि विकास चोडणकर उपस्थित होते. नाईक म्हणाले की, गोव्याचे नुकसान कोणालाही नको आहे. आम्हीही जनतेचे प्रतिनिधी म्हणून सर्व गोमंतकीयांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहोत.
केंद्र सरकारने 'जी राम जी' ही योजना सुरु केली आहे. पाणी, ग्रामसाधनसुविधा, उपजीविका आणि हवामान या चार विषयांवर या योजनेत बहम केले जाणार आहे. पूर्वी मनरेगा राबविताना १६३ कोटी रुपयांचा हिशोबच न मिळणे, ज्येष्ठांच्या अंगठ्याच्या ठशांवर रोजगार नोंदी होणे असे प्रकार घडले होते. मात्र आता योजनेत पारदर्शकता आणली असून निश्चितच त्याचा लाभ जनतेला होईल असे नाईक म्हणाले.
सर्वसामान्यांना रोजगार मिळावा आणि भ्रष्टाचाराला आळा नसावा या उद्देशाने 'जी राम जी' योजना अंमलात आणली असून ग्रामीण विकासासाठी तिचा मोठ्या प्रमाणावर लाम होणार आहे, असे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी सांगितले. या योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढील दोन-तीन महिन्यांत मतदारसंघानिहाय जनजागृती कार्यक्रम आणि संमेलने आयोजित करण्यात येणार आहेत असे सांगून त्यांनी केंद्र सरकारचे या योजनेसाठी अभिनंदन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.