Market
MarketDainik Gomantak

Bicholim News: गृहिणींसाठी दिलासादायक बातमी! गावठी मिरचीचे दर घटले

आवक वाढली : यंदा समाधानकारक पीक; डिचोलीत खरेदीसाठी गर्दी
Published on

Bicholim News पावसाळा जवळ आल्याने बाजारात गावठी लाल मिरचीची आवक वाढली आहे. डिचोलीत गेल्या दोन आठवडी बाजारांमध्‍ये स्थानिक गावठी मिरचीसह राज्याबाहेरील मिरची मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होत आहे.

ती खरेदी करण्‍यासाठी ग्राहकही गर्दी करीत आहेत. सध्‍या 800 ते 900 रुपये किलो दराने विकली जाणारी ही मिरची पुढील काही दिवसांत स्‍वस्‍त होण्‍याची चिन्‍हे दिसू लागली आहेत.

आज बुधवारी डिचोलीच्‍या साप्ताहिक बाजाराच्या दिवशी तर मिरची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गावठी मिरचीचे दर समाधानकारक असल्याने ग्राहक विशेष करून गृहिणींच्या तोंडावर काहीसे हास्य दिसून येत आहे.

दरम्यान, कृषी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा डिचोलीत गावठी मिरचीचे पिक समाधानकारक आलेले आहे.

Market
Mapusa News : गोंयकार धर्म सांभाळण्याची आज गरज

रोगाचा प्रादुर्भाव, त्यातच अवकाळी पावसामुळे गेल्या वर्षी मिरची पिकाच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला होता. परिणामी स्थानिक मिरची महाग झाली होती. गतसालच्‍या तुलनेत यंदा मात्र गावठी मिरचीचे दर अजूनतरी आवाक्यात आहेत.

यंदा साफ केलेल्या स्थानिक गावठी मिरचीचे दर 800 ते 900 रुपये किलो असे आहेत. गेल्या वर्षी स्थानिक गावठी मिरची सुरूवातीस ‘तिखट’ झाली होती. तिचे दर ऐकताच सामान्य ग्राहकांच्या कपाळावर आट्या पडत होत्या.

यंदा मिरची रोपांवर रोग-कीडीचा प्रादुर्भाव झालेला नाही. अवकाळी पावसानेही कृपा केली. त्यामुळे डिचोली तालुक्यात यंदा मिरचीचे पीक समाधानकारक आलेले आहे. बाजारातही मिरचीची आवक वाढली असून दरही नियंत्रणात आहेत.

- दीपक गडेकर, कृषी अधिकारी

Market
शैक्षणिक धोरणाचा श्रीगणेशा इथून होतो

राज्याबाहेरील मिरचीही दाखल

डिचोली बाजारात डिचोलीसह पेडणे, बार्देश, सत्तरी आदी तालुक्‍यांच्‍या काही भागात पिकणाऱ्या गावठी मिरचीसह कर्नाटक तसेच सिंधुदुर्गातील मिरची येत आहे. गेल्या आठवडी बाजारापासून बाजारात येणाऱ्या या मिरचीचे प्रमाण वाढले आहे.

राज्यातून उपलब्ध होणाऱ्या मिरचीपेक्षा कर्नाटकातील जांबोटी आणि महाराष्ट्रातील बांदा आदी भागातून उपलब्ध होणाऱ्या मिरचीचे प्रमाणही अधिक आहे. बेडगी आणि अन्य जातीची मिरची बाजारात विक्रीस उपलब्ध होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com