Mapusa News : गोंयकार धर्म सांभाळण्याची आज गरज

राजू नायक : जमात-ई-इस्लामी हिंद गोवातर्फे म्हापशात ‘ईद मीलन’ कार्यक्रम
Raju Nayak
Raju NayakGomantak Digital Team

म्हापसा : ठराविक लोकांनीच गोवा सांभाळला पाहिजे, असे काही नाही. सध्या गोंयकार धर्म सांभाळण्याची गरज आहे. सध्या प्रत्येक धर्माने सामाजिक पुढारी तयार करावेत आणि याच सामाजिक पुढाऱ्यांमार्फत मार्फत आपल्या धर्मात उणिवा किंवा वाईट गोष्टी असल्यास त्यावर बोलण्याचे अधिकार या पुढाऱ्यांना द्यावेत.

याशिवाय गोवा वाचविण्यासाठी जो संघर्ष किंवा लढा देतो, तोच मोठा धर्म असल्याचे उद्‍गार गोमन्तकचे संपादक-संचालक राजू नायक यांनी काढले. बुधवारी (ता.१०) सायंकाळी म्हापसा येथील श्री बोडगेश्वरच्या सभागृहात जमात ई इस्लामी हिंद गोवा, म्हापसा समितीतर्फे आयोजित ईद मीलनच्या कार्यक्रमात ते वक्ता म्हणून बोलत होते. यावेळी फा. कायतानो फर्नांडिस, मुहम्मद अब्दुला जावेद, अब्दुल वहीद खान हे व्यासपीठावर उपस्थित होते.

Raju Nayak
Summer Tips: उन्हाळ्यात मधुमेह असणाऱ्या लोकांनी घ्यावा 'या' 4 शीतपेयांचे सेवन

नायक पुढे म्हणाले, प्रत्येकांनी धार्मिक सलोखा जपण्याची गरज आहे. जो गोंयकारपण लोकांसमोर आणेल तोच मोठा धर्म. सध्या ख्रिश्चन समुदाय सक्रियपणे गोव्याचे हित सांभाळण्यात अग्रेसर दिसते. अशाच पद्धतीने गोवा वाचविण्याच्या संघर्षात जो भाग घेईल.

Raju Nayak
Ada Sharma Viral Video :'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माने केले शिवलिंगासमोर बसुन शिवतांडव स्तोत्राचे पठण..व्हिडीओ व्हायरल

त्याचे कार्य मोठे ठरेल आणि भविष्यात सामाजिक प्रश्न घेऊन समोर येणाऱ्यांच्या पाठीशी लोक खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मुहम्मद अब्दुला जावेद, इर्षाद शेख यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्त्यांना स्मृतिचिन्ह तसेच पुष्पगुच्छ देण्यात आले. या कार्यक्रमास पर्यावरणप्रेमी तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Nayak
Mapusa Court: म्हापसा न्यायालयाच्या महिला कर्मचाऱ्याला धमकी, कारने केला पाठलाग; कळंगुटच्या दोघांना अटक

नकारात्मकतेला थारा नको

फा. कायतानो फर्नांडिस म्हणाले, सोशल मीडियाच्या माध्यमांतून काहीजण द्वेष पसरवून धार्मिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशावेळी धार्मिक संस्थांनी जागृतीव्दारे ेलोकांना शिक्षित करावे. तसेच लोकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये. प्रत्येकाने एकमेकांच्या धर्माचा आदर करावा आणि सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य द्यावे. त्याचप्रमाणे, नकारात्मकतेला थारा देऊ नये, कारण ती एकोपा दूषित करते. त्यामुळे सर्व धर्मातील लोकांनी ऐक्याने नांदावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com