Good Governance Index 2021: ‘सुशासनात’ गोवा तिसऱ्या स्थानावर !

देशातील सर्व राज्यांचा सुशासन निर्देशांक: 2021 (Good Governance Index 2021) केंद्र मंत्रालयामार्फत जाहीर करण्‍यात आला आहे. त्यात गुजरात व महाराष्ट्रापाठोपाठ गोव्‍याने तिसरा क्रमांक पटकाविला.
Goa 

Goa 

Dainik Gomantak 

Published on
Updated on

पणजी: देशातील सर्व राज्यांचा सुशासन निर्देशांक: 2021 (Good Governance Index 2021) केंद्र मंत्रालयामार्फत जाहीर करण्‍यात आला आहे. त्यात गुजरात (Gujarat) व महाराष्ट्रापाठोपाठ (Maharashtra) गोव्‍याने तिसरा क्रमांक पटकाविला. 2019 च्या सुशासन निर्देशांकांपेक्षा यावेळी गोव्याने 24.7 टक्के वाढ केली आहे. दहा विविध क्षेत्रांत केलेल्या कामगिरीवर ही क्रमवारी ठरवली जाते. विशेष म्‍हणजे लहान राज्य असूनही गोव्याने (Goa) मोठी भरारी मारली आहे.

<div class="paragraphs"><p>Goa&nbsp;</p></div>
वाजपेयी देशवासियांना प्रेरणादायी आहेत:कृष्णा साळकर

केंद्राने जाहीर केलेल्या निर्देशांकांनुसार, सुशासनसंदर्भात (Good Governance Index 2021) राज्यांचा क्रमांक ठरविण्यासाठी 10 विविध क्षेत्रे व 58 इंडिकेटर्सचा समावेश केला जातो. त्यामध्ये कृषी व संलग्न क्षेत्र, वाणिज्य व उद्योग, मानव संसाधन विकास (Human resource development), सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक पायाभूत सुविधा व उपयुक्तता, अर्थव्यवस्था, सामाजिक कल्याण व विकास, न्यायसंस्था व सार्वजनिक सुरक्षा, पर्यावरण (environment) तसेच नागरिक संबंधित सुशासन याचा समावेश करण्यात आला होता. सुशासन : 2019 च्या तुलनेत यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या 2021 च्या निर्देशांकमध्ये 20 राज्यांनी जोरदार कामगिरी केली आहे. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची क्षेत्रनिहाय कामगिरी एक किंवा दुसऱ्या क्षेत्रातील मजबूत कामगिरी दर्शवतात.

सुशासन निर्देशांक 2021 केंद्राने जाहीर केला आहे. त्‍यात गुजरात (Gujarat) व महाराष्ट्र (Maharashtra) या मोठ्या राज्यांपाठोपाठ गोव्याला तिसरा क्रमांक मिळालाय. 2019 च्या तुलनेत यावर्षी 2021 मध्ये राज्याची विविध क्षेत्रांतील कामगिरी 24.7 टक्के अधिक आहे. जनतेच्या सहकार्याने राज्य सरकार त्यात अधिक सुधारणा करून आणखी चांगल्या सेवा देण्यासाठी तत्पर राहील.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com