Gomantak Summer Camp: बालभवन,पणजी येथे 14 मे रोजी ‘गोमन्तक’ समर कॅम्प

कॅम्पमध्ये मुलांना योगा, डान्स, स्टोरी टेलिंग, आर्ट आणि क्राफ्ट यांचे विशेष मार्गदर्शन दिले जाणार
Gomantak Summer Camp
Gomantak Summer CampGomantak Digital Team

Gomantak Summer Camp : गोमन्तक नेहमीच समाजोपयोगी तसेच समाजप्रबोधनासाठीचे उपक्रम राबवत असतो. या माध्यमातून गोमन्तक समर कॅम्पचे आयोजन बालभवन, पणजी यांच्या सहयोगाने रविवार,14 मे रोजी सकाळी 8.30 ते दुपारी1वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये मुलांना योगा, डान्स, स्टोरी टेलिंग, आर्ट आणि क्राफ्ट यांचे विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे.

तसेच मुलांकडून प्रात्यक्षिक करून घेतले जाणार आहे. या कॅम्पमध्ये वय वर्षे 8 ते18 वयोगटातील विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतील. या शिबिराचा अधिकाधिक मुलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी भारत पोवार (9881099247) यांच्याशी संपर्क साधावा.

Gomantak Summer Camp
Goa HSSC Result 2023 : बारावीच्या गुणपत्रिकांतील नावांत घोळ

तज्ज्ञांचे लाभणार मार्गदर्शन

सदर कॅम्पमध्ये योगसाधनेचे मार्गदर्शन महेश गावस हे करणार आहेत. डान्सचे प्रशिक्षण चैत्रा नावेलकर या देणार असून स्टोरी टेलिंगबाबत अशोक तिळवे आणि आर्ट आणि क्राफ्ट बाबतचे मार्गदर्शन कविता गौडा या करणार आहेत. या कॅम्पमधून मुलांना सुट्टीचा मनमुराद आनंद लुटत नवनव्या गोष्टी शिकवल्या जाणार असून नृत्य, कला आणि कथाकथनाचे मान्यवरांकडून मार्गदर्शन लाभणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com