Goa HSSC Result 2023 : बारावीच्या गुणपत्रिकांतील नावांत घोळ

सेंट ॲंड्र्यूज विद्यालयातील प्रकार : वडिलांचे नाव, आडनावही गायब
Goa HSSC Result 2023
Goa HSSC Result 2023Dainik Gomantak

Goa HSSC Result 2023 : गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावी परीक्षेच्या गुणपत्रिकेत विद्यार्थ्यांच्या वडिलांचे नाव व आडनाव नमूद केले नसल्याचे आढळून आल्याने वास्को येथील सेंट अँड्र्यूज विद्यालयातील विद्यार्थ्यांची तसेच पालकांची तारांबळ उडाली. दुरुस्तीसाठी विद्यालयाने विद्यार्थ्यांकडून गुणपत्रिका परत मागवल्या आहेत.

मात्र, पुढील प्रवेशासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी जाहीर केला. निकालानंतर मंडळाने गुणपत्रिका संबंधित विद्यालयात वितरीत केल्या. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिका विद्यालयातून घेतल्या व पुढील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू केली.

Goa HSSC Result 2023
International Nurses Day : रुग्‍णांच्‍या चेहऱ्यावरील हास्‍य हेच आमच्‍या सेवेचे मोठे फळ

दरम्यान, पुढील प्रवेशासाठी जेव्हा विद्यार्थ्यांनी अर्ज भरला तेव्हा मंडळाने दिलेल्या गुणपत्रिकेत काही विद्यार्थ्यांचे आडनाव तर काही गुणपत्रिकेत वडिलांचे नाव गायब असल्याचे दिसून आले. आपल्या विद्यालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यानुसार विद्यालयात सदर गुणपत्रिका विद्यार्थ्यांकडून परत मागवल्या आहेत.

Goa HSSC Result 2023
Daily Horoscope 12 May : आनंदी आनंद गडे! यांच्यासाठी असणार आनंदाचा दिवस; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

गुणपत्रिका परत करण्यासाठी रांगा

वाडे वास्को येथील सेंट अँड्र्यूज कॉलेजमध्ये आज गुणपत्रिका परत करण्यासाठी सकाळ पासून विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. त्या विद्यार्थ्यांकडून गुणपत्रिका दुरुस्तीसाठी लेखी अर्ज घेण्यात आला. त्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांनी दिलेल्या अर्जासहित गोवा शालांत मंडळाला पाठवणार आहे.

Goa HSSC Result 2023
Twinkle Khanna : अभिनेत्री बनण्याआधी ती मासे आणि झिंगे विकायची, लोक म्हणायचे तू...

प्रवेश लांबणीवर; पालकांनाही मनस्ताप !

गोवा शालांत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या या चुकीमुळे विद्यार्थ्यांची तसेच पालकांची धावपळ सुरू झाली आहे. विद्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका दुरुस्तीसाठी परत मागवल्या असून त्यानुसार विद्यार्थ्यांबरोबर पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ती आता लांबणीवर पडली आहे. कारण जोपर्यंत नवीन गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळत नाही तोपर्यत पुढील प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची वाट पाहत रहावे लागेल. त्यासाठी मंडळाने गुणपत्रिका तातडीने दुरुस्त करुन विद्यार्थ्यांना सुपूर्द कराव्यात, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com