Sanquelim Municipality : पालिकेच्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिलीय ग्वाही; म्हणाले, साखळीचा विकास...

मुख्यमंत्री सावंत ः साखळी पालिका बैठकीत विविध विषयांवर चर्चा
Sanquelim-Ponda Municipal Council Election
Sanquelim-Ponda Municipal Council ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

Sanquelim Municipality साखळी नगरपालिकेच्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विविध विकास प्रकल्पांबाबत मार्गदर्शन केले.

पालिकेतर्फे विचाराधीन असलेल्या विविध विकास प्रकल्पाचे ठराव घेऊन ते सरकार दरबारी द्यावे, पाठपुरावा करावा. हे सर्व प्रकल्प अमलात आणून साखळीचा गतीने विकास करावा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

नगराध्यक्ष रश्मी देसाई, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर व सर्व सहकारी नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, पालिका अभियंता व इतरांची उपस्थिती होती.

Sanquelim-Ponda Municipal Council Election
Women's Taxi Service: अरेरे...महिला टॅक्सी सेवा पडली बंद

पालिका इमारतीत असलेल्या 16 दुकानांचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला विषय या बैठकीत सोडविण्यात नगरपालिका मंडळाला यश आले.

या 16 दुकानमालकांना सरकारी दरानुसार लावण्यात आलेले भाडे परवडत नसल्याने त्यांनी सदर भाडेदर कमी करण्याची मागणी केली होती. नगरपालिका मंडळाच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांनीही याविषयी या दुकान मालकांचे हित जपताना कमी दराने भाडे आकारण्यास अनुमती दिली. त्यामुळे या दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला विषय अनेक वर्षानंतर सुटणार आहे.

Sanquelim-Ponda Municipal Council Election
Accident at Curchorem: कुडचडेत ड्रायव्हिंग स्कूलच्या कारला बसची धडक; मुलगी जखमी

20 कोटी अनुदानाची मागणी

साखळी नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. 2 मध्ये असलेल्या 12 हजार चौ. मी. जागेत दोन व्यावसायिक प्रकल्प आणण्याविषयी चर्चा करून ठराव घेण्यात आला.

साखळी नगरपालिकेला सरकारतर्फे 20 कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करण्यात आली असून त्यातून बाजारात एक मल्टीपर्पज सभागृह प्रकल्प व इतर विकास कामे साकारण्यात येणार आहे, असे नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी सांगितले.

Sanquelim-Ponda Municipal Council Election
Mapusa Accident: केवळ 'त्या' चिमुकल्याचे दैव बलवत्तर म्हणून...

साखळीत ‘रिंग रोड’ हवा

साखळी बाजारात ये-जा करण्यासाठी असलेले रस्ते सुधारण्याचे काम सध्या नगरपालिकेने हाती घेतले आहे. त्यासाठी बसस्थानकाच्या डाव्या बाजूला सध्या असलेल्या तात्पुरत्या रस्त्याच्या ठिकाणी पक्का रस्ता साकारण्याचा इरादा आहे.

त्यासाठी सदर जागेचे मालक असलेल्या देसाई कुटुंबीयाशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यांना इतरत्र जागा देऊन, या जागेचा उपयोग साखळी बाजारासाठी ‘रिंग रोड’ साकारण्यासाठी करण्यात येणार आहे, असे रश्मी देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com