वास्को: गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेने हेडलँड सडा येथील हुतात्मा स्मारकावरील बेकायदेशीर अतिक्रमणाच्या विरोधात तक्रार नोंदवून नाराजी व्यक्त केली आहे. हेडलँड सडा येथे लेफ्टनंट नरेंद्र मयेकर यांच्या स्मारकावर एका गोबी मंचुरियन विक्रेत्याने अतिक्रमण करून आपला व्यवसाय थाटल्याने गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेने नाराजी व्यक्त केली आहे.
(Gobi Manchurian vendor encroached on Lt. Narendra Mayekar's memorial)
शहीद लेफ्टनंट नरेंद्र मयेकर ईशान्य भागात कर्तव्य बजावत असताना देशासाठी शहीद झाले होते व देशासाठी शेवटच्या श्वास घेतला होता. आसाम ऑपरेशन 26 फेब्रुवारी 2000 मध्ये लेफ्टनंट मेकर आसाममध्ये तैनात असलेल्या 11 शीख बटालियनमध्ये सेवा देत होते. अतिरेकी प्रभावामुळे युनिटचे सैन्य वारंवार अतिरेक्याविरुद्ध ऑपरेशन मध्ये गुंतले होते. दहशतवादाला आळा घालण्यासाठी त्यांच्या ऑपरेशनचा एक भाग म्हणून संशयास्पद हालचालीवर नजर ठेवण्यासाठी युनिटने नियमित गस्त ठेवली होती. 26 फेब्रुवारी 2000 रोजी युनिटने अतिरेकी लपलेल्या ठिकाणाविरुद्ध कारवाई सुरू केली. लेफ्टनंट मेकर यांच्याकडे ऑपरेशनचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
लेफ्टनंट मयेकर आपल्या सैन्यासह बगारीगुढी गावात कारवाई करताना अतिरेक्याने केलेल्या गोळीबारात लेफ्टनंट मेकर जखमी होऊन अतिरेक्याची दोन हात करून नंतर शहीद झाले. नंतर यांना देशाचा दुसरा सर्वोच्च शांतता काळातील शौर्य पुरस्कार "कीर्ती चक्र" देण्यात आले.
दरम्यान शहीद लेफ्टनंट मयेकर यांच्या हेडलँड सडा येथील हुतात्मा स्मारकाजवळ एका गोबी मंचुरियन विक्रेत्यांनी अतिक्रमण करून आपला व्यवसाय थाटला आहे. अतिक्रमण करून चार ते पाच दिवस झाले तरी एकाही अधिकाऱ्याने या अवैद्य अतिक्रमणाबाबत विचारणा केली नाही किंवा कारवाई करण्याचे धाडस केले नाही.
लेफ्टनंट शहीद नरेंद्र मयेकर यांची बदनामी करण्याच्या या घटनेकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. या अतिक्रमणाची परवानगी देणारे विक्रेत्यासह तितकेच जबाबदार आहे. तेव्हा या बेकायदा अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यावर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर योग्य त्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच या अतिक्रमण करणाऱ्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर ही कारवाई करावी अशी मागणी गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेने केली आहे. याविषयी त्यांनी मुख्य सचिव, रक्षा सचिव दक्षिण गोवा जिल्हाधिकारी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.