Goa News: घरगुती गॅस सिलिंडर वजनात फेरफार! तिसरा प्रकार उघडकीस

वजन व माप खात्याकडून वेर्णा येथे घातलेल्या धाडीत 15 कमी वजनाचे सिलिंडर सापडले
Domestic gas cylinder weight change third type revealed in goa
Domestic gas cylinder weight change third type revealed in goaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस काढून तो व्यवसायिक गॅस सिलिंडरमध्ये भरून ते सिलिंडर परस्पर राज्यांतील तारांकीत हॉटेल्सना विकण्याची टोळी राज्यांत सक्रिय झाल्याचा आरोप होत असतानाच आज वजन व माप खात्याच्या अधिकाऱ्यांनी वेर्णा येथे एका निर्जन जागेत ठेवलेली सिलिंडर पुरविणारी गाडी पकडली असता तिथे कमी वजनाचे 15 सिलिंडर सापडले.

(Domestic gas cylinder weight change third type is revealed in goa)

Domestic gas cylinder weight change third type revealed in goa
Goa Crime News: कोल्हापूर पर्यटकांच्या लूटप्रकरणातील संशयित शिल्पा थापाला जामीन नामंजूर

वजन व माप खात्याने केलेली ही मागच्या महिन्याभरातील तिसरी करवाई असून या पूर्वी पर्वरी येथे घातलेल्या धाडीत 33 कमी वजनाचे तर बेतालभाटी येथे केलेल्या कारवाईत 17 कमी वजनाचे सिलिंडर सापडले होते.

वजन व माप खात्याचे निरीक्षक नितीन पुरूशन यांनी ही कारवाई केली असून या प्रकरणी एक गाडी जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेले सिलिंडर हे आगशी येथील कनिष्क या एजन्सीचे असल्याचे सांगण्यात येते.

ही एजन्सी आगशी येथील असताना ती वेर्णा परीसरात कशी पोहोचली हा यक्षप्रश्न सध्या लोकांना पडला आहे. ज्या जागेत ही गाडी पडकली तिथे जवळच्या झाडीत कित्येक सिलिंडर टाकून दिलेले आढळून आले असून तिथे गॅस सिलिंडरना बसविण्यात येणारी कित्येक सिल्स सापडल्याने गॅस सिलेंडरमधील गॅस काढून तो दुसऱ्या सिलिंडरमध्ये भरण्यासाठीच ती तिथे आणली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या गाडीच्या मागे वजन व माप खात्याची येणारी गाडी पाहून सिलिंडर वाहून नेणाऱ्या गाडीच्या चालकाने जंगलात पळ काढल्याने संशयाचे वलय अधिकच गडद झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com