Goa BJP: 'ही' चर्चा बाहेर सांगता येणार नाही! दोन्ही नेत्यांनी बैठकीविषयी बोलणे टाळले; मात्र तंबी मिळाल्‍याची कुजबूज

Goa Political News: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांना काल सोमवारी श्रेष्‍ठींनी एकत्र दिल्लीत बैठकीसाठी बोलावले आणि राजकीय चर्चेला एकच उधाण आले. अनेकांनी यानिमित्ताने कल्पनांचे पतंग उडविले.
Goa Political News: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांना काल सोमवारी श्रेष्‍ठींनी एकत्र दिल्लीत बैठकीसाठी बोलावले आणि राजकीय चर्चेला एकच उधाण आले. अनेकांनी यानिमित्ताने कल्पनांचे पतंग उडविले.
Goa BJP | Pramod Sawant | Vishwajit RaneCanva
Published on
Updated on

Goa BJP Leaders Meeting At Delhi

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांना काल सोमवारी श्रेष्‍ठींनी एकत्र दिल्लीत बैठकीसाठी बोलावले आणि राजकीय चर्चेला एकच उधाण आले. अनेकांनी यानिमित्ताने कल्पनांचे पतंग उडविले. ‘या बैठकीत काय चर्चा झाली ती सार्वजनिक करण्यासारखी नाही, ती राजकीय चर्चा होती’ असे या दोन्ही नेत्यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

सध्या चार राज्यांतील निवडणुकांचा हंगाम आहे. काश्मीरात मतदानाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. शेजारील महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नव्हते. तेथे विधानसभेत भाजपला पुन्हा सत्तेत परतायचे आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासोबतीने भाजप निवडणुकीला सामोरा जात असताना तेथे भाजपला कुमक आणि रसद हवी आहे.

कोकणातील मतदारसंघांची जबाबदारी गोव्यातील (Goa) भाजप नेत्यांवर सोपविण्‍यात आलेली आहे. तर, कोकणच्या संघटन सचिवपदाची निवडणुकीपुरती जबाबदारी सतीश धोंड यांच्याकडे देण्यात आली आहे. शिवाय भारतीय जनता महिला मोर्चाच्या प्रभारी आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्याकडे प्रभारीपद देण्यात आले आहे. उत्तर कोकणातील मतदारसंघांची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडे तर दक्षिण कोकणातील मतदारसंघ राणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत.

विश्‍‍वजीत राणे यांनी अलीकडे बेरोजगारीबाबत केलेल्या विधानावरून ते चर्चेत आले होते. राज्यातील भूरूपांतर करण्यास कोणी परवानगी दिली यावरूनही दोन्ही नेत्यांत वाद आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठक बोलावली गेल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्‍या होत्‍या. पक्षश्रेष्ठींनी या दोन्ही नेत्यांना जाहीर वक्तव्य न करण्याबाबतची तंबी देतील अशी अटकळही व्यक्त केली जात होती.

काही जणांनी या बैठकीचा संबंध मंत्रिमंडळ फेरबदलाशीही लावला तर काही जणांच्या चर्चेने तर दिगंबर कामत यांना सभापती करून रमेश तवडकर यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाईल इथपर्यंतही मजल गेली. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ही बैठक मंत्रिमंडळ फेरबदलाशी संबंधित नाही असे स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री या़ंच्यातील वाद मिटवण्यासाठी ही बैठक झाली अशी चर्चा सुरू झाली आहे. या दोन्ही नेत्यांनी बैठकीविषयी जाहीरपणे बोलणे टाळल्याने सोयीस्कर अशा राजकीय चर्चेला ऊत आला आहे.

बैठकीबाबतची उत्‍सुकता आणखी वाढली

दिल्लीत सोमवारी मोतीलाल नेहरू मार्गावरील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत विविध राज्यांच्या नेत्यांसोबत बैठका झाल्‍या. याचदरम्यान मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांचा सहभाग असलेली बैठक झाली. या बैठकीविषयी कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांना देण्‍यात आलेली नाही. तरीही अंदाजाने या बैठकीत काय झाले याच्या बातम्या दिल्या गेल्या. सावंत आणि राणे या दोघांशी ‘गोमन्तक’ने संपर्क साधल्यावर ही राजकीय चर्चा बाहेर सांगण्यासाठी नाही एवढेच उत्तर त्यांनी दिले. मात्र त्‍यामुळे या बैठकीबाबतची उत्‍सुकता आणखी वाढली आहे.

Goa Political News: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांना काल सोमवारी श्रेष्‍ठींनी एकत्र दिल्लीत बैठकीसाठी बोलावले आणि राजकीय चर्चेला एकच उधाण आले. अनेकांनी यानिमित्ताने कल्पनांचे पतंग उडविले.
BJP: 'मीटिंग' नेमकी कशासाठी? नड्डा यांच्या निवासस्थानी अमित शहांनी घेतली बैठक; मुख्यमंत्री सावंत आणि राणेंची उपस्थिती

‘भिवपाची गरज ना’

मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांनी समाजमाध्यमांवर ‘भिवपाची गरज ना’ असा प्रचार सुरू केला आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी आपल्या वैयक्तिक फेसबुक पेजवरील प्रोफाईलचे छायाचित्र आज सायंकाळी बदलल्यानंतर त्‍यांचे समर्थन करणाऱ्या संदेशांचा ओघ तेथे सुरू झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com