BJP: 'मीटिंग' नेमकी कशासाठी? नड्डा यांच्या निवासस्थानी अमित शहांनी घेतली बैठक; मुख्यमंत्री सावंत आणि राणेंची उपस्थिती

Goa BJP: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या बैठकीमुळे राजकीय चर्चेला उधाण
Goa BJP: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या बैठकीमुळे राजकीय चर्चेला उधाण
Amit Shaha|J P Nadda|Pramod Sawant|Vishwajit Rane Canva
Published on
Updated on

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या बैठकीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. नड्डा यांच्या निवासस्थानी सोमवारी रात्री उशिरा ही बैठक झाली. मात्र, या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली याची माहिती मिळू शकली नाही. रात्री अकरा वाजेपर्यंत बैठक सुरूच होती, अशी माहिती दिल्लीतील सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक आज घेतली आणि ते दिल्लीला जाणार या माहितीला पाय फुटले. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना शहा यांनी दिल्लीला बैठकीला बोलावल्याची वार्ता राज्यात चवीने चर्चिली जात होती. या बैठकीत काय झाले, याविषयी सत्ताधारी गोटातूनच नव्हे तर विरोधकांमध्‍येही उत्सुकता होती.

सावंत व राणे यांच्यात राजकीय स्पर्धा नाही, असे सत्ताधारी गोटातून कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी ती लपून राहिलेली नाही. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्यातील राजकीय शीतयुद्धाची चर्चा राजकीय वर्तुळात गेले काही महिने आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी दिल्लीत बोलावलेली बैठक राजकीय समेटासाठी असावी, अशी चर्चा राज्यात सुरू आहे.

Goa BJP: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या बैठकीमुळे राजकीय चर्चेला उधाण
Goa Government Job: घरबसल्या येईल सरकारी नोकरीचा कॉल; गोवा सरकारची भन्नाट योजना, अशी करा नोंदणी

गोव्‍याबाबत चर्चा

दिल्लीतील बैठक ही मंत्रिमंडळ फेरबदलासाठी नाही, असे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी स्पष्ट केले.

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. गोव्याकडे कोकणातील निवडणुकीची जबाबदारी आहे. त्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होऊ शकते.

याशिवाय राज्यासाठी आवश्यक असणाऱ्या आणि महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. मंत्रिमंडळ फेर बदलाचा विषय असता तर मलाही बैठकीला बोलावले असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cm pramod sawant on goa fisheries
Goa Warkari Tradition History Before Portuguese
Goa Government Development Exhibition
home minister amit shah reviews goa st reservation file
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com