Goa Rice Farming : परतीच्या 'पावसाचा' जोर वाढला तर..! शेतकरी चिंतेत; काही भागात भातमळणीला सुरूवात

Agricultural activities in Goa: राज्यातील काही भागात भाताच्या मळणीला सुरूवात झाली आहे. तर अनेक भाग असे आहेत जेथे अजून भाताची कणसे हिरवी आहेत. ताळगावात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला सुरूवात केली होती.
Goa Rice Farming: राज्यातील काही भागात भाताच्या मळणीला सुरूवात झाली आहे. तर अनेक भाग असे आहेत जेथे अजून भाताची कणसे हिरवी आहेत. ताळगावात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला सुरूवात केली होती.
Rice ThreshingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील काही भागात भाताच्या मळणीला सुरूवात झाली आहे. तर अनेक भाग असे आहेत जेथे अजून भाताची कणसे हिरवी आहेत. ताळगावात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला सुरूवात केली होती.

जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात भात रोपणी करण्यात आली. पेरणी आणि रोपणी लवकर झाली, त्यामुळे जुलैमध्ये राज्यात जोरदार पावसाचा फटका जसा इतर भागातील भातशेतीला बसला तेवढा मोठा फटका लवकर पेरणी, रोपणी केलेल्या शेतकऱ्यांच्या भात शेतीला बसला नाही. परिणामी आता ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भाताची मळणी करून भात घरी नेले जाणार आहे. त्यामुळे जर पुढील काळात पाऊस पडला तरी या शेतकऱ्यांना काही भीती नाही.

Goa Rice Farming: राज्यातील काही भागात भाताच्या मळणीला सुरूवात झाली आहे. तर अनेक भाग असे आहेत जेथे अजून भाताची कणसे हिरवी आहेत. ताळगावात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला सुरूवात केली होती.
Rice Farming: अति पावसामुळे गोव्यातील 'भातशेती' कशी येते संकटात?

अस्मानी संकट घोंगावतेय; शेतकरी चिंतेत

राज्यातील अनेक भागात परंपरागत भातशेती केली जाते. अनेक शेतकरी जूनच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात भात पेरणी करतात त्यामुळे रोपणी जुलै महिन्यात येते व सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कणसे येऊन नोव्हेंबरच्या शेवटी कुठे भात कापणी होते. यंदा जून महिन्यात भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना जुलैमधील मोठ्या प्रमाणात बरसलेल्या पावसाचा फटका बसला.मोठ्या प्रमाणात भातशेती कुजली आणि त्यातून सावरलेल्या भातशेतीला आता कणसे धरली असून जर परतीच्या पावसाचा जर येत्या काळात जोर वाढला तर पुन्हा शेतीवर अस्मानी संकट सावट घोंगावेल,अशी भीती असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com