गोमन्तक डिजिटल टीम
तांदूळ हे प्रमुख पीक असल्याने गोव्यात भातशेतीला अनन्यसाधारण महत्व आहे. खरीप हंगामातील भातशेती पावसाळ्यात सुरु होते.
लावणीनंतर सतत मुसळधार पाऊस सुरु राहिला तर भातशेतीला धोका निर्माण होतो. शेतकऱ्याच्या मेहनत आणि पैश्यांवर पाणी फिरते.
अति पावसामुळे शेतात पाणी भरून राहते. सतत पाणी भरून राहिल्यास रोपे कुजतात.
मोठा पूर आल्यास वाहून आलेली झाडे, मोठाल्या फांद्या बंधाऱ्यात अडकतात आणि यामुळे आसपासच्या शेतात नदीचे पाणी घुसते.
पावसाच्या काळात भरती तसेच अन्य कारणामुळे खारे पाणी शेतात घुसले आणि साचले की भातशेतीला फटका बसतो तसेच जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होतो.
भातशेतीकरता पाणी आवश्यक असतेच पण ते मर्यादेपेक्षा जास्त काळ शेतात राहिले की ते पीकाला नष्ट करते.
पुरामुळे शेतकऱ्यांना शेतात जाताही येत नाही. पुरामुळे गाळ साठला असतो आणि शेत पूर्णपणे चिखलमय झालेले असते.
ऑगस्ट महिना सुरू झाला आणि मुसळधार पाऊस सुरूच असला की पीक नष्ट होण्याची चिंता असते. असे संकट उद्भवले की शेतकऱ्यांना सरकारी मदतीवर अवलंबून राहावे लागते.
निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा गोव्यातील एक 'खास' उत्सव