Menino Figueiredo: गोव्याचे महान फुटबॉलपटू मिनिन फिगेरेदो यांचे निधन

गोव्याचे पहिले आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू; राज्य संघाचे कर्णधारपदही सांभाळले
Menino Figueiredo: गोव्याचे महान फुटबॉलपटू मिनिन फिगेरेदो यांचे निधन
Dainik Gomantak

Menino Figueiredo Passed Away: गोव्याचे महान फुटबॉलपटू मिनिन फिगेरेदो यांचे निधन झाले. आज, शनिवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. गोव्याचे पहिले आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू म्हणून त्यांची ओळख आहे.

त्यांनी राज्याच्या फुटबॉल संघाचे कर्णधारपदही भुषविले होते. 1964 मध्ये संतोष ट्रॉफी स्पर्धेत त्यांनी राज्य संघाचे नेतृत्व केले होते. मिनिन फिगेरेदो यांनी वयाच्या 17 व्या वर्षी MCC सोबत क्लब स्तरावर खेळायला सुरुवात केली.

1959 मध्ये त्यांनी पोर्तुगालच्या बेनफिका आणि कराची पोर्ट ट्रस्ट संघाविरुद्ध पणजी पोलिस मैदानावर गोवा निवड संघात त्याचा समावेश करण्यात आला. त्यांनी गोवा इलेव्हन संघातही स्थान मिळवले.

Menino Figueiredo: गोव्याचे महान फुटबॉलपटू मिनिन फिगेरेदो यांचे निधन
Super Cup Football : एफसी गोवा पूर्ण ताकदीनिशी मैदानात

ते पोर्तुगालचा दौरा करणार होते पण 1961 मध्ये पोर्तुगीज राजवटीपासून गोवा मुक्त झाला आणि त्यांचा पोर्तुगालचा दौरा थांबला. त्यानंतर, साळगावकर एफसीमध्ये व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून ते 13 वर्षे खेळले. या काळात ते संघाचे एक महत्वाचे खेळाडू म्हणून त्यांचा लौकीक होता. फुटबॉल संघात ते डिफेंडर (बचावपटू) होते.

1962 मध्ये, मिनिन आणि संपूर्ण साळगावकर संघाचा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला होता. गोव्याच्या या संघाने दिल्ली येथे डीसीएम फुटबॉल स्पर्धेत भाग घेतला होता.

Menino Figueiredo: गोव्याचे महान फुटबॉलपटू मिनिन फिगेरेदो यांचे निधन
दिल्ली कॅपिटल्सच्या भिडूची लगीनघाई! IPL 2023 सोडून परतला मायदेशी

1963 मध्ये, त्यांनी रशियन संघाविरूद्ध भारतात भारतीय संघाचे मिनिन नेतृत्व केले होते. 1963-64 च्या मोसमात मिनिन यांनी साळगावकर क्लबचे नेतृत्व केले. रशियन संघाने पुन्हा भारत दौरा केला तेव्हा मिनिन यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय संघात आमंत्रित केले गेले.

1967 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध मुंबई येथे झालेल्या प्रदर्शनीय सामन्यासाठी भारत इलेव्हनमध्येही त्याचा समावेश करण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com