दिल्ली कॅपिटल्सच्या भिडूची लगीनघाई! IPL 2023 सोडून परतला मायदेशी

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार परदेशी ऑलराऊंडर लग्नासाठी मायदेशी परतला आहे.
Delhi Capitals
Delhi CapitalsDainik Gomantak

Mitchell Marsh fly back to Australia: एक आठवड्यापूर्वी आयपीएल 2023 स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पण पहिल्याच आठवड्यात काही खेळाडू दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामातूनच बाहेर पडले, त्यामुळे अनेक संघात बदली खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. पण आता अशी बातमी समोर आली आहे की दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू मिचेल मार्श पुन्हा काही दिवसांसाठी मायदेशी परतणार आहे.

लग्नासाठी मार्श मायदेशी रवाना

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू असलेला मार्श त्याच्या लग्नासाठी मायदेशी जाणार आहे. लग्न सोहळ्यानंतर तो लगेचच पुन्हा भारतात येईल आणि आयपीएल 2023 साठी दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील होईल.

याबद्दल दिल्ली कॅपिटल्सचे गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की 'मार्श पुढील काही सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. तो लग्न करत आहे.'

Delhi Capitals
IPL 2023: लखनऊचा हैदराबादवर दणदणीत विजय! कृणाल पंड्याची 'ऑलराऊंड' कामगिरी ठरली मोलाची

मार्शकडून दिल्लीला मोठ्या अपेक्षा आहेत.कारण आयपीएलपूर्वी तो दमदार फॉर्ममध्ये होता. त्याने ऑस्ट्रेलियाकडून भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली होती. मात्र तो आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्या दोन सामन्यात खास काही करू शकलेला नाही.

पहिल्या सामन्यात तर तो शुन्यावरच बाद झाला, तर दुसऱ्या सामन्यात त्याने 4 धावा केल्या आणि 1 विकेट घेतली होती. पण आता लग्नानंतर परत आल्यावर तो चांगली कामगिरी करेल, अशी आशा दिल्लीला असेल.

दरम्यान, दिल्लीला तिसरा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज (8 एप्रिल) खेळायचा आहे. हा सामना राजस्थानचे घरचे मैदान असलेल्या गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर रंगणार आहे. दुपारी 3.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

Delhi Capitals
Video Viral: रुटला नाचताना पाहिलंय का? चहलकडून इंग्लंडच्या दिग्गजाचं IPL मध्ये हटके वेलकम

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की राजस्थानचा प्रमुख फलंदाज जोस बटलर या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या बोटाला पंजाब किंग्सविरुद्धचा सामना खेळताना दुखापत झाली आहे. त्यामुळे राजस्थानकडून जो रूटला बटलरच्या जागेवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात संधी दिली जाऊ शकते. असे झाल्यास हे रूटचे आयपीएल पदार्पणही ठरेल.

तसेच मार्शच्या ऐवजी आज होणाऱ्या सामन्यात रोवमन पॉवेलला दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com