Super Cup Football : एफसी गोवा पूर्ण ताकदीनिशी मैदानात

ब्रँडन फर्नांडिसकडे संघाचे नेतृत्व कायम
FC Goa team practice session
FC Goa team practice sessionDainik Gomantak
Published on
Updated on

केरळमध्ये होणाऱ्या सुपर कप फुटबॉल स्पर्धेसाठी एफसी गोवाने पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्यावर भर दिला असून 26 सदस्यीय संघ निवडण्यात आला. यामध्ये सहा परदेशी, तसेच नऊ 23 वर्षांखालील वयोगटातील खेळाडू आहेत. आयएसएल स्पर्धेत नेतृत्व केलेला ब्रँडन फर्नांडिस कर्णधारपदी कायम आहे.

सुपर कप स्पर्धेतील एफसी गोवाचा पहिला सामना 10 एप्रिल रोजी जमशेदपूर एफसीविरुद्ध होईल. आयएसएल करंडक विजेता एटीके मोहन बागान व गोकुळम केरळा हे ‘क’ गटातील अन्य संघ आहेत. सामने कोझिकोड येथे खेळले जातील. गटसाखळीतील विजेता संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.

FC Goa team practice session
Job Fair In Goa: गोमन्तकीय तरूणांनो जॉब शोधताय? लागा तयारीला! फ्रेशर, अनुभवी उमेदवारांसाठी सरकारी जॉब फेअर, वाचा सविस्तर

एफसी गोवाच्या सुपर कप संघात गोव्यातील दहा खेळाडू असून यामध्ये डेव्हलपमेंट संघातील रायन मिनेझिस याचाही समावेश आहे. त्याला सीनियर संघात प्रथमच संधी मिळाली आहे.

एका आशियाई खेळाडूसह सहा परदेशी खेळाडू संघात आहेत. स्पेनचे अल्वारो वाझकेझ, इकेर ग्वार्रोचेना, एदू बेदिया, हर्नान सांताना, मोरोक्कोचा नोआ सदावी यांच्यासह सीरियाचा फारेस अर्नोट हा आशियाई महासंघ संलग्न खेळाडू आहे.

FC Goa team practice session
Goa: हुंड्यात दिली नाही BMW कार! डॉक्टर बायकोला गोवा विमानतळावर सोडून नवरा फरार, दागिनेही केले लंपास

एफसी गोवा संघ

गोलरक्षक : धीरज सिंग, अर्शदीप सिंग, ह्रतीक तिवारी, बचावपटू ः सॅन्सन परेरा, अन्वर अली, फारेस अर्नोट, लिअँडर डिकुन्हा, निखिल प्रभू, सेरिटन फर्नांडिस, सावियर गामा, ऐबांभा डोहलिंग, हर्नान सांताना, लेस्ली रिबेलो, रायन मिनेझिस, मध्यरक्षक ः ब्रँडन फर्नांडिस, आयुष छेत्री, माकन चोठे, रेडीम ट्लांग, एदू बेदिया, लेनी रॉड्रिग्ज, ब्रायसन फर्नांडिस, लालरेमरुआता एचपी, आघाडीपटू ः नोआ सदावी, देवेंद्र मुरगावकर, इकेर ग्वार्रोचेना, अल्वारो वाझकेझ.

स्पर्धेतील गतविजेता संघ

सुपर कप स्पर्धा २०१८-१९ मध्ये शेवटच्या वेळेस झाली होती. तेव्हा एफसी गोवा संघाने विजेतेपद मिळविले होते. यंदा कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखालील संघ स्पर्धेत गतविजेते असतील.

एफसी गोवाचे गटसाखळी वेळापत्रक

10 एप्रिल ः विरुद्ध जमशेदपूर एफसी, १४ एप्रिल ः विरुद्ध गोकुळम केरळा, 18 एप्रिल ः विरुद्ध एटीके मोहन बागान.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com