Goa Politics: भाजप सरकारमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर गोव्याची बदनामी; तृणमूल काँग्रेसचा घणाघाती आरोप

गोव्याची बदनामी : तृणमूल काँग्रेसचे ट्रोजन डिमेलो यांची टीका
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak

Goa News: राज्यातील एकूणच प्रशासन डबघाईला आले, असून यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार जबाबदार आहे. राज्यात घडत असलेल्या अनेक हल्ले आणि फसवणुकीच्या घटनांबद्दल घडत आहेत. भाजप सरकारमुळे प्रशासन पूर्णता ढासळले आहे, अशी टीका तृणमूल काँग्रेसचे प्रसार माध्यम समन्वयक ट्रोजन डिमेलो यांनी केली.

ते पुढे म्हणाले, जपानी पर्यटकाला लुबाडणुकीच्या घटनेवर एक मुख्यमंत्र्यांनी शब्दही उच्चारला नाही. पोलिस असल्याची तोतयागिरी करून या विदेशी पाहुण्यावर कथितपणे हल्ला केला आणि फसवणूक केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याचे नाव बदनाम झाले आहे,

पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सोबत पक्षाचे सरचिटणीस गिलरॉय कोस्टा आणि युवा विभागाचे समन्वयक अँथनी पिक्सोटो उपस्थित होते.

Goa Politics
Goa Crime: विद्यार्थी अपहरण प्रकरणी जन्मठेप; फिल्मी स्टाईलने पकडले होते आरोपींना

जपानी पर्यटकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आलेले नसून हे यंत्रणेचे उपयश आहे. या प्रकरणी पर्यटन मंत्र्यांचे मौन चिंताजनक असून कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सरकारच्या बांधिलकीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या राज्याच्या पोलीस खात्‍याला अशा घटनांची सखोल चौकशी करून न्याय मिळेल, याची खात्री दिली पाहिजे, असे डिमेलो म्हणाले.

Goa Politics
Goa Government: गतिशक्ती पोर्टलच्या डेटामुळे रेल्वे अन् रस्त्यांची कनेक्टिव्हिटी शक्य

गुन्हेगारांसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून गोवा होत असल्याची बाब चिंताजनक आहे. गुन्हेगारांना गोव्याचा लपण्यासाठी वापर करण्यापासून रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

अलीकडेच हैदराबादमधील दोघांना जणांनी डांबून ठेवून खंडणीच्या प्रयत्नामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या सरकारच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com