Goa Government: गतिशक्ती पोर्टलच्या डेटामुळे रेल्वे अन् रस्त्यांची कनेक्टिव्हिटी शक्य

पंतप्रधान गतिशक्ती अंतर्गत गोव्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण, पर्यटन व कृषी क्षेत्राची माहिती (डेटा लेयर्स) गतिशक्ती पोर्टल उपलब्ध करण्यात आली आहे.
Goa Government
Goa Government Dainik Gomantak

Goa Government: पंतप्रधान गतिशक्ती अंतर्गत गोव्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, शिक्षण, पर्यटन व कृषी क्षेत्राची माहिती (डेटा लेयर्स) गतिशक्ती पोर्टल उपलब्ध करण्यात आली आहे.आतापर्यंत या पोर्टलवर विविध 99 डेटा लेयर्स घालण्यात आले आहे.

या पोर्टलद्वारे 5 राज्यांचे कनेक्टिव्हीटी व लॉजिस्टीक्स तसेच साधनसुविधांवर भर दिला जात आहे. गोव्यात छोट्या प्रकल्पांचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती गोवा वाणिज्य, व्यापार व उद्योग खात्याच्या संचालक स्वेतिका सचन यांनी दिली.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागातर्फे (डीपीआयआयटी) पणजीतील ताज विवांता येथे पश्‍चिम आणि मध्य विभागांसाठी पंतप्रधान गतिशक्ती पोर्टलची पहिली प्रादेशिक कार्यशाळा झाली.

या कार्यशाळेत विविध राज्यांच्या प्रधान सचिवांनी तसेच केंद्रातील दूरसंचार, वाहतूक व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही भाग घेतला. या गतिशक्ती पोर्टलमुळे राज्यांमध्ये सुरु असलेल्या प्रकल्पांची माहिती तसेच तेथील असलेल्या समस्या यासंदर्भातची माहिती पोर्टलवर मिळू लागली आहे.

Goa Government
Goa Police: वाहतुकीवर पाळत ठेवण्यासाठी गोवा पोलिसांचे मोठे पाऊल

या पोर्टलमुळे रेल व रस्त्यांची कनेक्टिव्हिटी व त्यातून राज्यांना घेता येणारे लाभ याचाही फायदा होऊ लागला आहे, अशी माहिती या कार्यशाळेच्या अध्यक्षपदी असलेल्या गतिशक्ती मंत्रालयाच्या विशेष सचिव (लॉजिस्टिक्स) सुमिता डावरा यांनी दिली.

द्रुतगती मार्ग आणि रेल्वेंना कोणतेही अडथळे येऊ नयेत, यासाठी ऊर्जा मंत्रालय पंतप्रधान गतिशक्ती अंतर्गत ऊर्जा प्रकल्पांचे नियोजन केले आहे. केंद्र सरकार पंतप्रधान गतिशक्ती अंतर्गत संपूर्ण 5-जी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची योजना आखत आहे. सुमिता डावरा म्हणाल्या.

Goa Government
Goa Crime: विद्यार्थी अपहरण प्रकरणी जन्मठेप; फिल्मी स्टाईलने पकडले होते आरोपींना

रस्त्यांचे नियोजन शक्य

पंतप्रधान गतिशक्ती पोर्टलमुळे राज्यांच्या आर्थिक वाढीला मदत होणार आहे. हे पोर्टल भविष्याच्या दृष्टीने मोठे पर्व आहे. प्रत्येक राज्याला भविष्यात साधनसुविधाच्या बाबतीत नियोजन करण्याची संधी प्राप्त झाली आहे.

या पोर्टलवर असलेल्या डेटामुळे विविध राज्यांनी त्यांच्या विविध क्षेत्रात केलेल्या कामांबाबतची माहिती एकमेकाला पाहण्यास मिळणार आहे. त्याचा अधिक फायदा हा रस्ता कनेक्टिव्हिटीसाठी तसेच रस्त्यांचे नियोजन करण्यात मदत होणार आहे, असे रस्ता वाहतूक मंत्रालयाचे सुदीप चौधरी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com