Goa Child Adoption: 'म्हारी छोरियां छोरो से कम है के? आगे हैं'! मुली दत्तक घेण्‍यास गोमंतकीयांचे प्राधान्‍य; अहवालातून माहिती उघड

Goans prefer adopting girls: देशातील विविध राज्‍यांमध्‍ये अजूनही ‘मुलींपेक्षा मुले श्रेष्‍ठ’ अशी मानसिकता असताना गोमंतकीयांनी मात्र ही मानसिकता खोडून काढली आहे.
Goans prefer adopting girls
Goans prefer adopting girlsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: देशातील विविध राज्‍यांमध्‍ये अजूनही ‘मुलींपेक्षा मुले श्रेष्‍ठ’ अशी मानसिकता असताना गोमंतकीयांनी मात्र ही मानसिकता खोडून काढली आहे. ‘मुलांपेक्षा मुलगीच बरी, प्रकाश देते दोन्‍ही घरी...’ या तत्वास त्यांनी प्राधान्य दिल्याचे सिद्ध झाले आहे.

२०१८–१९ ते २०२४–२५ या सात वर्षांच्‍या काळात राज्‍यात एकूण १२८ मुलांना दत्तक घेण्‍यात आले. त्‍यात मुलांची संख्‍या ५२, तर मुलींची संख्‍या ७६ असल्‍याचे सांख्‍यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केलेल्‍या ‘चिल्‍ड्रन इन इंडिया’ अहवालातून समोर आले आहे.

गोव्‍यासह सर्वच राज्‍यांनी सात वर्षांत किती मुलांना दत्तक घेतले, त्‍यात मुला–मुलींची संख्‍या किती आहे, याची सविस्‍तर आकडेवारी अहवालातून सादर करण्‍यात आलेली आहे. या सात वर्षांत गोमंतकीयांनी मुलांपेक्षा मुलींना दत्तक घेण्‍यावर अधिक भर दिलेला आहे. गोमंतकीयांनी गतवर्षी सर्वाधिक २६ मुलांना दत्तक घेतले. त्‍यातही मुलींचीच संख्‍या अधिक असल्‍याचेही अहवालातून दिसून येते.

Goans prefer adopting girls
Girl Lives in Office Toilet: महागाईला त्रासलेल्या 18 वर्षीय तरुणीने ऑफिसच्या शौचालयातच उभारलं घर

गतवर्षी विदेशातून घेतले तीन मुलींना दत्तक

२०२४–२५ मध्‍ये गोमंतकीयांनी ज्‍या २६ मुलांना दत्तक घेतले, त्‍यात विदेशातील तीन मुलींचाही समावेश असल्‍याचे अहवालातील आकडेवारीतून दिसून येते. या वर्षी गोमंतकीयांनी देशभरातून ११ मुले आणि १२ मुली मिळून २३ जणांना दत्तक घेतले. तर, विदेशातील तीन मुलींनाही दत्तक घेतल्‍याचे ‘चिल्‍ड्रन इन इंडिया’ अहवाल सांगतो.

Goans prefer adopting girls
Usgao Missing Girl: उसगांवमध्ये नववीत शिकणारी मुलगी बेपत्ता, काही तासांत फोंड्यातील दुसरी घटना; पोलिसात तक्रार दाखल

भारतीयांकडूनही मुलीच दत्तक घेण्‍यास प्राधान्‍य

गोव्‍यासह देशभरातील नागरिकांकडूनही मुलांपेक्षा मुलींनाच दत्तक घेण्‍यास अधिक प्राधान्‍य दिले जात असल्‍याचेही अहवालातून दिसून येते. या सात वर्षांच्‍या काळात २६,७२१ मुलांना दत्तक घेण्‍यात आले. त्‍यात मुलांची संख्‍या ११,२६५ आणि मुलींची संख्‍या १५,४५६ इतकी असल्‍याचेही अहवालातून समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com