Girl Lives in Office Toilet: महागाईला त्रासलेल्या 18 वर्षीय तरुणीने ऑफिसच्या शौचालयातच उभारलं घर

18-Year-Old Lives in Office Toilet in China: भारताच्या शेजारील देश चीनमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथील एका 18 वर्षीय मुलीने चक्क ऑफिसमधील टॉयलेटला आपला आशियाना बनवला.
Girl Lives in Office Restroom
Girl Lives in Office ToiletDainik Gomantak
Published on
Updated on

China Toilet Girl story: भारताच्या शेजारील देश चीनमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथील एका 18 वर्षीय मुलीने चक्क ऑफिसमधील टॉयलेटला आपला आशियाना बनवला. होय, हे ऐकून तुम्ही चकीत झाला ना... पण हे खरं आहे. इथे राहण्यासाठी ही मुलगी भाडेही देते. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुलगी टॉयलेटमध्ये राहण्यासाठी तब्बल 50 युआन म्हणजे अंदाजे 7 डॉलर्स दरमहा भाडे देत आहे. चला तर मग हे नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया...

टॉयलेटला बनवले घर

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हुबेई प्रांतातील एका ग्रामीण कुटुंबातून आलेली यांग हुनान प्रांतातील झुझोऊ येथील एका फर्निचर स्टोअरमध्ये सेल्सचे काम करते. या शहरात सरासरी पगार 7,500 युआन आहे, परंतु या मुलीला केवळ दरमहा 2,700 युआन पगार मिळतो. झुझोऊमध्ये परवडणारे घर शोधणे देखील तिच्यासाठी एक संघर्ष बनला आहे. या शहरातील स्थानिक भाडे 800 ते 1,800 युआन पर्यंत आहे. त्यामुळे, तिला ऑफिसमधील टॉयलेटला आपले घर बनवावे लागले.

Girl Lives in Office Restroom
Viral Post: दिल्ली में तो पनीर सब जगह मिल जाता हैं! गोव्यातील रेस्टॉरंटमध्ये महिलेचा राडा; नेटकऱ्यांनी शिकवला 'कॉमन सेन्स'

टॉयलेटमध्ये राहण्यासाठी बॉसशी करार

अतिरिक्त आर्थिक दबाव सहन करण्याऐवजी, यांगने आपल्या मालकाशी सहा चौरस मीटरच्या ऑफिसमधील टॉयलेटमध्ये (Toilet) राहण्यासाठी करार केला. दोन स्क्वॅट टॉयलेट आणि एक सिंक असलेल्या जागेला यांगने आपले घर बनले. यांगने एक फोल्डिंग बेड, कपड्यांचा रॅक, एक लहान स्वयंपाकाचे भांडे आणि गोपनीयतेसाठी एक पडदा बसवला आहे.

यांग म्हणते, 'मला काही अडचण नाही'

यांग याबाबत सांगते, मला या ठिकाणी राहण्यासाठी कोणतीही अडचण नाही. मी दररोज टॉयलेट स्वच्छ करते. कधीकधी रात्री मी इथे नूडल्स बनवून खाते. तर माझे सहकारी दिवसा त्या जागेचा वापर करतात. कंपनीकडून 24 तास देखरेख ठेवली जात असल्याने मला इथे सुरक्षित वाटते. मी कधीही दार बंद करत नाही आणि कधीही काहीही हरवले नाही.

Girl Lives in Office Restroom
Viral Video: मेट्रोतील 'या' व्हिडिओत नेमकं काय घडलं? चीनवर होतोय स्तुतीसुमनांचा वर्षाव; व्हायरल व्हिडिओ एकदा पाहाच

यांगने रुम भाड्याने घेण्याचा विचार केला

यांगचे बॉस झू यांनी तरुण कर्मचाऱ्यांना (Employees) स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न करताना येणाऱ्या अडचणी मान्य केल्या. सुरक्षितता आणि सोयीचे कारण देत, यांगने टॉयलेट वापरण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याने यांगला काही काळ त्याच्या घरी राहू दिले.

झू ने सांगितले की, यांगने महिन्याला 400 युआन देऊन रुम घेण्याचा विचार केला होता, परंतु अखेर तिने याउलट निर्णय घेतला. मात्र झू ने आता यांगला महिन्याच्या अखेरीस नव्याने नूतनीकरण केलेल्या कार्यालयात हलवण्याचे आश्वासन दिले आहे.

सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली

यांगने सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म डुयिनवर तिची स्टोरी शेअर केल्यानंतर तिला 15,000 हून अधिक फॉलोअर्स मिळाले. काही वापरकर्त्यांनी ती परिस्थिती नाट्यमय करत आहे का? असा प्रश्न विचारला, परंतु यांगने आग्रह धरला की, ती व्यावहारिक आहे. तर इतर वापरकर्त्यांनी तिच्या परिस्थितीबाबत प्रशंसा आणि चिंता व्यक्त केली.

यांगने शेअर केलेल्या स्टोरीवर भाष्य करताना एका सोशल मीडिया वापरकर्त्याने म्हटले की, 'तिच्यासारखी मुलगी जे काही करेल त्यात ती यशस्वी होईल.' तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटले की, 'मला आशा आहे की ती लवकरच नवीन आणि तिच्या स्वत:च्या घरात राहण्यासाठी जाईल.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com