Goa politics: भाडोत्रींकडे पक्ष देणार नाही, पक्षाविरोधात कारवाया करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही; मनोज परबांचा इशारा

Revolutionary Goans Party Crisis: आमदार वीरेश बोरकर यांच्या भाडोत्रींकडे तसेच आदित्य देसाई यांच्यासारख्या माणसांच्या ताब्यात रिव्हॉल्युशनरी पक्ष (आरजीपी) दिला जाणार नाही.
Revolutionary Goans Party Crisis
Revolutionary Goans Party CrisisDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आमदार वीरेश बोरकर यांच्या भाडोत्रींकडे तसेच आदित्य देसाई यांच्यासारख्या माणसांच्या ताब्यात रिव्हॉल्युशनरी पक्ष (आरजीपी) दिला जाणार नाही. तसेच पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही, असा इशारा अध्यक्ष मनोज परब यांनी दिला. दरम्यान, आमदार बोरकर यांच्यासह त्यांच्या तीन समर्थक सदस्यांनी आजच्या बैठकीकडे पाठ फिरवली.

पक्षाच्या केंद्रीय समितीच्या पणजीत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना परब म्हणाले की, पक्षातीलच काही पदाधिकारी विविध कारस्थाने करून पक्षात फूट पाडण्याचा आणि पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, आरजीपीचे अस्तित्त्व आपल्याला कायम ठेवायचे आहे. पक्ष घडवण्यासाठी अनेकांनी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांचा विश्वासघात आपल्याला करायचा नाही. त्यामुळे पक्ष बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Revolutionary Goans Party Crisis
Goa Politics: मनोजनंतर अजयकडूनही सोशल मीडियाद्वारे 'बाण'; 'आरजी'त 'उजो'; कार्यकर्त्यांच्‍या ब्रेनवॉशचा आरोप

आमदार वारेश बोरकर यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांसोबत संबंध कायम ठेवतानाच मडगावात पक्ष ताब्यात घेण्याबाबत गुप्त बैठक घेतली. तसेच आदित्य देसाई यांच्यासारख्यांकडून कायदेशीर सल्ले घेणे सुरूच ठेवले आहे. देसाई हे दुसऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक पेज चालवत आहेत, असा आरोपही परब यांनी केला.

वीरेशसमोर मी अक्षरशः रडलो ,माझ्यात आणि आमदार वीरश बोरकर यांच्यात फूट पाडण्याचे प्रयत्न काहीजण करत आहेत. त्यामुळे मी बोरकर यांच्यासमोर रडलोही आहे.पक्ष ताब्यात घ्यायचा असेल, तर कार्यालयात येऊन रितसर पद्धतीने तो ताब्यात घ्यावा, असे आवाहन मी स्वतः बोरकर यांना केले होते. तरीही त्याला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आदित्य देसाई आणि ज्युलियस आल्मेदा यांना सोबत घेऊन त्यांनी पक्ष ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालवले आहेत, असा आरोप मनोज परब यांनी केला.

Revolutionary Goans Party Crisis
Goa Politics: "बापाला मुलांनी शिकवू नये!" मनोज परब यांच्या 'पोस्ट'ने पक्षात खळबळ; ‘आरजी’तील मतभेद चव्‍हाट्यावर!

... म्हणूनच वीरेश यांना 'कारणे दाखवा'

पक्षविरोधी कारवाया केल्यामुळेच आगशीचे पंच ज्युलियस आल्मेदा यांना 'कारणे दाखवा' नोटीस जारी केली होती. तरीही आमदार वीरेश बोरकर यांनी त्यांच्याशी जवळीक ठेवली. त्यातच बोरकर यांना तीनवेळा नोटीस जारी करूनही ते पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांनाही पक्षाने रितसर 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे, असे अजय खोलकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com