पणजी : राज्यात केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या मोठी असून यापुढेही केंद्र सरकारच्या योजना राज्यात राबविल्या जातील. याचा राज्यातील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. (Goan people benefitted from Centre government's scheme says CM Pramod Sawant)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या ‘आजादी का अमृत महोत्सव’चा भाग म्हणून हिमाचल प्रदेशमधील सीमला येथे गरीब कल्याण संमेलनात भाग घेतला. या संमेलनातून पंतप्रधानांनी गोव्यातील केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी हिमाचलचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर उपस्थित होते.
पणजी येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात मुख्यमंत्री डॉ. सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मत्स्य व्यवसाय मंत्री नीळकंठ हळर्णकर, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मयेचे आमदार प्रेमेन्द्र शेट उपस्थित होते. हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीमला संमेलनाला जोडला होता. आम्ही आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पाहिले असून नव्या भारतात ते साकारताना दिसत आहे. आम्हाला इथली व्यवस्था बदलायची आहे, असेही मोदी म्हणाले.
थेट खात्यावर पैसे : भ्रष्टाचाराला आळा यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, पूर्वी देशाची प्रतिमा विविध प्रकारचे घोटाळे आणि भ्रष्टाचाराने डागाळलेली होती. पण आज ही परिस्थिती बदलत आहेत. लोक केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत असून वेगवेगळे छोटे-मोठे व्यवसाय करत आहेत. ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर’ योजनेअंतर्गत लाभार्थींच्या खात्यात पैसे हस्तांतर केले जात आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे.
योजना मार्गी लावण्यासाठी साधक-बाधक चर्चा
या कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, अमृत यासारख्या योजनांच्या लाभार्थींशी पंतप्रधानांनी संवाद साधला. याशिवाय स्वदेश निधी योजना, वन नेशन, वन रेशन कार्ड, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आयुष्मान भारत, पीएम जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत कल्याण आणि आरोग्य योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना या योजनांची ही यावेळी चर्चा झाली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.