Sea ​​Tourism : समुद्री पर्यटन हंगामाची सांगता; शेवटचे पर्यटक जहाज दाखल

Sea ​​Tourism : सप्टेंबर २०२३ ते जून २०२४ या पर्यटन हंगामात ६३ देशी-विदेशी जहाजांतून १ लाख ४० हजार देशी-विदेशी पर्यटक आले.
Sea ​​Tourism
Sea ​​Tourism Dainik Gomantak
Published on
Updated on

Sea ​​Tourism :

वास्को, ‘एमव्ही एम्प्रेस’ या देशाअंतर्गत जहाजाने २०२३-२४ या सागरी पर्यटन हंगामाची आज सांगता झाली. मुंबईमार्गे १७३६ प्रवाशी व ५७७ कर्मचारी वर्ग मिळून २३१३ पर्यटकांना घेऊन हे पर्यटक जहाज मुरगाव बंदरात दाखल झाले.

दरम्‍यान, दुसऱ्या टप्प्यात जानेवारी ते जूनपर्यंत या सहा महिन्यांत ४१ देशी-विदेशी जहाजांतून ७५ हजार पर्यटक गोव्यात दाखल झाले. तर, सप्टेंबर २०२३ ते जून २०२४ या पर्यटन हंगामात ६३ देशी-विदेशी जहाजांतून १ लाख ४० हजार देशी-विदेशी पर्यटक आले.

गोव्यात २०२३-२४ या समुद्री पर्यटन हंगामाला २२ सप्टेंबर २०२३ रोजी ''एम्‍प्रेस'' या देशाअंतर्गत पर्यटक जहाजाच्‍या आगमनाने प्रारंभ झाला. या हंगामात सप्टेंबर ते डिसेंबर २०२३ या चार महिन्यांच्या पहिल्या टप्प्यात समुद्रमार्गे मुरगाव बंदरात २६ जहाजांतून ४३ हजार ५०० पर्यटक तसेच या जहाजांतील १९ हजार कर्मचारी मिळून ६२, ५०० देशी-विदेशी पर्यटक गोव्यात आले व त्यांनी येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला.

पर्यटन हंगामाच्‍या दुसऱ्या टप्प्यातील पहिले विदेशी पर्यटक जहाज ‘एम. व्ही. रिव्हेरा’ मुंबईमार्गे गोव्यात मुरगाव बंदरात १०४१ प्रवासी व ७५५ कर्मचारी मिळून १७९६ विदेशी पर्यटकांना घेऊन दाखल झाले होते. २०२३-२४ या समुद्री पर्यटन हंगामाला २२ सप्टेंबर २०२३ रोजी ‘एम्‍प्रेस’ या पर्यटक जहाजाद्वारे सुरूवात झाली होती. मुंबईमार्गे गोव्यात मुरगाव बंदरात सदर पर्यटक जहाज सुमारे १५०० देशी-विदेशी पर्यटकांना घेऊन दाखल झाले होते.

संध्‍याकाळी जहाज मुंबईकडे रवाना

आज ‘एमव्ही एम्प्रेस’ हे पर्यटन हंगामातील शेवटचे जहाज मुरगाव बंदरात एकूण २३१३ पर्यटकांना घेऊन दाखल झाले. सकाळी ११ वाजता त्‍यांनी बंदरावर पाय ठेवला व नंतर टॅक्‍सी वा इतर वाहने पकडून गोव्याच्‍या विविध भागांत रवाना झाले. संध्याकाळी पुन्‍हा त्‍यांनी मुरगाव बंदर गाठले. नंतर सदर जहाज या पर्यटकांना घेऊन मुंबईला रवाना झाले. अशा प्रकारे २०२३-२४ या समुद्री पर्यटन हंगामाची सांगता झाली.

Sea ​​Tourism
Goa News : ‘साल्ढाणा’तील शौचालयाची ३१ जुलैपर्यंत दुरुस्ती : मंत्री आलेक्स सिक्वेरा

हंगामात एकूण ६७ पर्यटक जहाजे

२०२३-२४ या समुद्री पर्यटन हंगामात ६७ देशी-विदेशी पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात दाखल झाली. यात कॉस्ता सेरेना, रेसितियन्ट तेडी, मारेला डिस्कव्‍हरी, सेव्हन सीज नेव्‍हिगेटर, सेलेब्रिटी मिलेनियम, बोल्लेट, नौटिका या सात प्रसिद्ध विदेशी पर्यटक जहाजांचा समावेश होता. तर, दुसऱ्या टप्यात जानेवारी ते जून २०२४ पर्यंत एकूण ४१ देशी पर्यटक जहाजे दाखल झाली व त्‍यातून एकूण ४० हजार देशी-विदेशी पर्यटक आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com