Goa
GoaDainik Gomantak

Goa News : ‘साल्ढाणा’तील शौचालयाची ३१ जुलैपर्यंत दुरुस्ती : मंत्री आलेक्स सिक्वेरा

Goa News : साहित्यांच्या चोरीमुळे कामाला विलंब
Published on

Goa News :

सासष्टी, माथानी साल्ढाणा जिल्हा प्रशासकीय भव्य इमारतीतील शौचालयांचा प्रश्र्न गेले कित्येक महिने कर्मचारी तसेच लोकांना सतावत आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने शौचालय दुरुस्तीचे काम कंत्राटदाराला दिले असून हे काम ३१ मेपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता होती. पण हे काम अजून पूर्ण झाले नाही. या संदर्भात आज पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी ३१ जुलैपर्यंत शौचालयांची दुरुस्ती पूर्ण होईल, असे सांगितले.

मंत्री सिक्वेरा म्हणाले, जूनपर्यंत मुख्य ब्लॉकमधील शौचालयांची दुरुस्ती पूर्ण होईल. त्यानंतर इतर दुरूस्ती कामे ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येतील कंत्राटदाराच्या म्हणण्यानुसार त्याने दुरुस्तीसाठी जे सामान आणले होते, ते चोरीस गेले. त्यामुळे दुरुस्ती कामाला विलंब झाला. तसेच शौचालयात कर्मचारीवर्ग आपले जेवणाचे डबे स्वच्छ करतात, त्यामुळे तेथे शिल्लक अन्न टाकले जाते. त्यामुळे त्या पाईपही भरल्या आहेत.

शिवाय तेथे कचराही आहे. त्यामुळे या कामात अडथळा निर्माण झाला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. यापुढे असे अन्न फेकणे चुकीचे आहे, तसे न करण्याबाबत जिल्हाधिकारी आदेश काढणार आहेत. आणखी एक न्यायालयीन इमारत बांधण्यात येत आहे. त्या इमारतीत दिवाणी व इतर न्यायालये आणली जातील. या इमारतीचे काम आणखी सहा ते सात महिन्यात पूर्ण होईल, असेही सिक्वेरा यांनी सांगितले.

Goa
North Goa Court: मंत्री बाबूश आणि माविन यांच्‍या विरोधातील खटले उत्तर गोव्‍यातील न्‍यायालयात वर्ग

कायदा पाळावा!

आजच्या सार्वजनिक बैठकीत काही लोकांनी घरे कायदेशीर करण्याचा विषय उपस्थित केला. त्यावर चर्चा झाली. यात जिल्हाधिकाऱ्यांची चूक नाही, असे सांगून मंत्री सिक्वेरा म्हणाले, की घर मालकांनी जमिनीचे रूपांतर केलेले नाही.

लोकांनी कायदेशीर बाबी पाळलेल्या नाहीत. वन, सर्वेक्षण, नगर नियोजन खात्यांकडून महत्त्वाचे दाखले अर्जाला जोडलेले नाही. त्यामुळे घरे कायदेशीर करण्यास उशीर होत असल्याचे मंत्री सिक्वेरा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com