Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Goa Vijayanagar Empire History: गोव्यात १३८० ते १४७० अशी अनेक दशके विशाल विजयनगर साम्राज्याच्या अंतर्गत राज्य केले गेले ज्यात संपूर्ण गोव्याची भरभराट झाली.
Goa medieval history, Vijayanagar Empire, Devaraya First, Nageshi inscription
Goa medieval history, Vijayanagar Empire, Devaraya First, Nageshi inscriptionDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

गोवा १३८० ते १४७० अशी अनेक दशके विशाल विजयनगर साम्राज्याचा भाग होता व यात संपूर्ण गोव्याची भरभराट झाली. विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेनंतर अवघ्या काही दशकांत जवळजवळ संपूर्ण दक्षिण भारत या साम्राज्याने जिंकला होता, एवढ्या विशाल साम्राज्याचा महान प्रतापी राजा हरिहर (द्वितीय) याने १३४४ ते १४०४ या त्याच्या कालावधीच्या अंतर्गत विजयनगर साम्राज्य अनेक प्रांतांमध्ये किंवा राज्यांमध्ये विभागले.

प्रांतांचे प्रशासन सुरुवातीला मोठ्या प्रमाणात विकेंद्रित केले गेले होते, जिंकलेल्या क्षेत्रांना स्थानिक सरदारांच्या आधिपत्याखाली सामंत म्हणून राज्य करण्याची परवानगी होती. २९ ऑगस्ट १३८० रोजी हरिहर (द्वितीय) याच्या आदेशाने बहामनी सल्तनतीकडून गोवा जिंकल्यानंतर लगेचच मल्लप्पा वोडेयर म्हणजेच वीर वसंत-माधव राया (माधव मंत्री) याला कोकण-राज्याच्या महाप्रधानाचा दर्जा देण्यात आला, ज्याची राजधानी गोपकपट्टण किंवा आजचे गोवा वेल्हा होती.

माधव मंत्री त्या पूर्वी एकाच वेळी बारकुर-राज्य(दक्षिण कन्नड) आणि उत्तर कन्नडचा राज्यपाल म्हणून काम पाहत होते. विजयनगर साम्राज्याचा राजा हरिहर द्वितीयच्या दरबारातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्यांनी संपूर्ण कोकण- कर्नाटक किनारपट्टीवर राज्य केले. गोव्यात फोंड्यातील नागेशी येथील श्रीनागेश मंदिराच्या समिती कार्यालयाच्या भिंतीवर लावलेला एक दगडी पाषाण मध्ययुगीन काळातील १४१३चा शिलालेख मंदिराच्या वैभवाचे दर्शन घडवतो.

माई शेणवीने गावाला २० तांक भेट दिली आणि बागेवर लावले जाणारे सर्व कर माफ केले. माई शेणवीने असेही ठरवले की गोपाळ भट्टने दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री मंदिरासमोरील दीपमाळ पेटवण्यासाठी काही प्रमाणात तेल आणि वाती द्याव्यात. या नागेशी शिलालेखात केलेल्या वर्णनावरून राजा देवराय (प्रथम) ज्यांना विजयनगरचे शासक ‘महाराजाधिराज परमेश्वर श्री वीर प्रताप देवराय महाराज’ असे संबोधले गेले आहे जो विजयनगर साम्राज्याचा ५ नोव्हेंबर १४०६ - २५ फेब्रुवारी १४२३ या राज्यकाळत सम्राट होता.

हरिहर(द्वितीय) यांच्या मृत्यूनंतर , त्याच्या मुलांमध्ये उत्तराधिकारावरून वाद झाला, ज्यामध्ये देवराय (प्रथम) अखेर विजयी झाला. तो एक अतिशय सक्षम शासक होता जो त्याच्या लष्करी कारनाम्यांसाठी आणि त्याच्या साम्राज्यातील सिंचन कामांच्या योजनांसाठी प्रसिद्ध होता. त्याने घोडदळात सुधारणा करून विजयनगर सैन्याचे आधुनिकीकरण केले.

तुर्किक कुळातील कुशल धनुर्धारींना नियुक्त केले आणि त्याच्या धनुर्धरांची लढाई क्षमता वाढवली व अरबस्तान आणि पर्शियातून घोडे आयात केले. विजयनगर साम्राज्याची राजधानी १५व्या शतकातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक बनवण्याचे श्रेय देवराय (प्रथम) यांना जाते. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची कमतरता असल्याने शाही राजधानीची वाढ मर्यादित होत आहे हे त्यांनी जाणले.

सुमारे १४१०मध्ये त्यांनी तुंगभद्रा नदीवर एक बंधारा बांधला आणि तुंगभद्रा नदीपासून राजधानीपर्यंत २४ किमी लांबीच्या जलवाहिनीचे बांधकाम सुरू केले गेले. नुनिज या इतिहासकाराने दिलेल्या माहितीप्रमाणे देवराय (प्रथम) यांनी हाती घेतलेल्या अनेक प्रकल्पांची त्यांनी माहिती दिली आहे ज्यामुळे साम्राज्यात समृद्धी आली. प्रशासकीय बाबींमध्ये देवराय प्रथमने धर्मनिरपेक्षता राखली. त्यांच्या सैन्यातील मुस्लिम सैनिकांच्या सोयीसाठी त्यांनी एक मशीद आणि एक कत्तलखाना बांधला होता असे पुरावे सापडतात.

त्याच्या कारकिर्दीत, देवराय गोलकोंडाच्या वेलामा, गुलबर्गाचा बहमनी सुलतान, कोंडाविडूचा रेड्डी आणि विजयनगरचे पारंपरिक प्रतिस्पर्धी, कलिंगाचे गजपती यांच्याशी सतत युद्ध करत होते. तुर्की कुळातील कुशल धनुर्धारींना नियुक्त करून आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या विशाल प्रदेशाचे व्यवस्थापन करण्यास देवराय (प्रथम) सक्षम होता आणि त्याच्या धनुर्धरांची लढण्याची क्षमता वाढवत होता. रेड्डी राज्यात बंड निर्माण झाल्यानंतर, देवराय पहिल्याने रेड्डी राज्याचे विभाजन करण्यासाठी वारंगलशी युती केली.

Goa medieval history, Vijayanagar Empire, Devaraya First, Nageshi inscription
Portuguese Goa History: 1895 साली दादा राणेंनी पोर्तुगीज सरकारविरुद्ध बंड पुकारलं; आफ्रिकेत पोहोचले गोव्यातले सच्चे मराठे सैनिक

सुमारे १४२० मध्ये, फिरोजशहाने वारंगलवर आक्रमण केले परंतु दोन वर्षांच्या वेढ्याचा शेवट फिरोजशहाच्या सैन्यासाठी आजार आणि आपत्तीत झाला. देवरायाने फिरोजशहाचा पराभव केला. देवरायाच्या सैन्याने फिरोजशहाच्या सैन्याची कत्तल केली. देवराय प्रथमच्या नेतृत्वाखालील सैन्याने फिरोजचा त्याच्याच प्रदेशात खोलवर पाठलाग केला, जो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता.

Goa medieval history, Vijayanagar Empire, Devaraya First, Nageshi inscription
Goa History: गोव्यातील महिलांना सोन्याचं इतकं वेड का? सुवर्ण अलंकारांचा जागतिक तोरा!

शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुलतानला त्याच्या राज्याचे दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील जिल्हे देवराय प्रथमच्या स्वाधीन करावे लागले. ऐतिहासिक नोंदींवर आधारित, विजयनगर साम्राज्याच्या राजवंशाचा सम्राट देवराय (प्रथम) यांचा मृत्यू २५ फेब्रुवारी १४२३ रोजी झाला. ६०० वर्षे पूर्ण होऊनही आपल्या गोव्यात व गोव्याच्या पाठ्यपुस्तकात या महान प्रतापी राजाचा उल्लेख एक-दोन शिलालेख सोडले तर कुठेच सापडत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com