

केपे: सावर्डे जिल्हा पंचायत मतदारसंघात यावेळी भाजपचे मोहन गावकर व अपक्ष उमेदवार आतिष गावकर यांच्यात सरळ लढत होणार असल्याची चर्चा आहे.
सावर्डे जिल्हा पंचायत मतदारसंघ यावेळी अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवला असल्याने माजी झेडपी सदस्य सुवर्णा तेंडुलकरऐवजी भाजपने स्थानिक आमदार गणेश गांवकर यांचे कट्टर समर्थक मोहन गांवकर यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार आतिष गावकर, काँग्रेसचे शिरोडकर, तसेच ‘आरजी’नेही आपला उमेदवार जाहीर केला आहे.
या मतदारसंघात मोहन गांवकर व आतिष गांवकर या दोघांत खरी लढत होणार असून सध्या आतिष गांवकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
भाजपाचे उमेदवार मोहन गांवकर यांना स्थानिक आमदार गांवकर यांनी लोकांवर मुद्दामहून थोपवले आहे, असे लोकांचे म्हणणे आहे. कारण मोहन यांचे म्हणावे तसे कोणतेच कार्य या मतदारसंघात दिसत नसल्याचे लोकांचे मत आहे.
उलट आतिष गांवकर यांचे वडील बारकेलो गांवकर, काका रमाकांत गांवकर यांचे गेल्या तीस वर्षांपासून दाबाळ पंचायतीवर वर्चस्व आहे. त्यांचे समाज कार्य नेहमी सुरू असते, असे लोकांचे म्हणणे आहे.
आतिषच्या पाठिशी दीपक पाऊसकर
सावर्डे मतदारसंघात भाजप उमेदवाराचा पराभव स्पष्टपणे दिसत असल्याने भाजपने माजी खासदार विनय तेंडुलकर, संकेत आर्सेकर यांना मैदानात उतरवले असून अपक्ष उमेदवार आतिष गांवकर यांना माजी आमदार दीपक पाऊसकर तसेच स्थानिक अनुसूचित जमातीच्या नेत्यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे.
दीपक पाऊसकर गांवकर यांच्याबरोबर घरोघरी भेट देत असून आपल्या कार्यकाळात केलेली विकास कामे लोकांना पटवून देण्यावर ते भर देत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.