

पणजी: यावेळच्या जिल्हा पंचायत निवडणुकीत पन्नासही मतदारसंघांत ९४३० मते बाद ठरली. केरीत सर्वाधिक ४७७ तर रायमध्ये ९६ मते बाद ठरल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सादर केलेल्या आकडेवारीतून दिसून येते. दरम्यान, जे उमेदवार शंभर, दोनशेपेक्षा कमी मतांनी पराभूत झाले, अशांना या बाद मतांचा लाभ मिळू शकला असता. त्यामुळे त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीत यावेळी पन्नास मतदारसंघांतील ८ लाख ६८ हजार ६३७ मतदारांना मतदानाचा अधिकार मिळाला होता. त्यातील ६ लाख १५ हजार ५८१ मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. त्यामुळे यंदा विक्रमी ७०.८१ टक्के मतदानाची नोंद झाली.
या निवडणुकीत भाजप-मगो युतीला ३२, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीला ११, पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजी)पक्षाला २, आम आदमी पक्षाला (आप) १ तर अपक्षांनी ४ जागा जिंकल्या.
पाच उमेदवार हे शंभरपेक्षा कमी मतांनी निवडून आले. भाजपचा रिवणमधील उमेदवार तर अवघ्या १९ मतांनी विजयी झाला. शिवाय दोनशेपेक्षा कमी मतांनीही अनेकांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. अशा स्थितीत बाद मते ग्राह्य ठरली असती तर या पाचही जणांना लाभ होण्याची शक्यता होती, अशी चर्चा राज्यभरात सुरू आहे.
दरम्यान, उत्तर गोव्यातील २५ मतदारसंघांत ५४११ आणि दक्षिण गोव्यातील २५ मतदारसंघांत ४०१९ अशी एकूण ९४३० मते बाद ठरल्याचे आकडेवारीतून दिसून येते.
कोठे किती मते बाद?
दक्षिण गोवा
उसगाव-गांजे - १६८
बेतकी-खांडोळा- १७१
कुर्टी- १५८
वेलिंग-प्रियोळ- २०५
कवळे- २७०
बोरी- १६९
शिरोडा- १४०
राय- ९६
नुवे- १२७
कोलवा- १२२
वेळ्ळी- ९७
बाणावली- १४१
दवर्ली- २२२
गिरदोली- २०२
कुडतरी- १५०
नावेली- ९८
सावर्डे- १४१
धारबांदोडा- १५९
रिवण- २४५
शेल्डे- १२०
बार्शे- २७८
खोला- १८६
पैंगीण- १८७
सांकवाळ- १९३
कुठ्ठाळी- १३४
एकूण ४०१९
उत्तर गोवा
हरमल- १४५
मोरजी- १११
धारगळ- १३३
तोरसे- १६२
शिवोली- ९२
कोलवाळ- १५८
हळदोणा- २२०
शिरसई- १५९
हणजूण- १३९
कळंगुट- १८०
सुकूर- १८६
रेईश-मागूश- १३६
पेन्ह-द-फ्रान्स- १९८
सांताक्रुझ- २३१
ताळगाव- ३०४
चिंबल- २४१
खोर्ली- २२०
सेंट लॉरेन्स- १८१
लाटंबार्से- २३५
कारापूर-सर्वण- २८७
मये - २२५
पाळी- ३१२
होंडा- ३४६
केरी- ४७७
नगरगाव- ३३३
एकूण ५४११
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.