ZP ELection 2025: प्रचाराचा आज अखेरचा दिवस, भाजप, काँग्रेसच्‍या दिग्गजांकडून 'पायाला भिंगरी'

Goa ZP ELection 2025: शनिवारी होणाऱ्या जिल्‍हा पंचायत निवडणुकीच्‍या प्रचाराचा गुरुवारचा (संध्या ५ वाजेपर्यंत) अखेरचा दिवस.
ZP ELection 2025
ZP ELection 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शनिवारी होणाऱ्या जिल्‍हा पंचायत निवडणुकीच्‍या प्रचाराचा गुरुवारचा (संध्या ५ वाजेपर्यंत) अखेरचा दिवस असल्‍यामुळे राजकीय पक्षांच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांसह अपक्ष उमेदवारांनीही प्रचारावर जोर दिला आहे.

मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक, दिल्लीचे माजी मुख्‍यमंत्री तथा आपचे राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, आतिषी, काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रभारी सचिव डॉ. अंजली निंबाळकर या नेत्‍यांनी प्रत्‍यक्ष मैदानात उतरून निवडणूक प्रतिष्‍ठेची बनवली आहे. गुरुवारचा अखेरचा दिवस असल्‍याने हे सर्वच नेते आणि कार्यकर्ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्‍याचा प्रयत्‍न करतील.

आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्‍हणून पाहिल्‍या जात असलेल्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत सत्ताधारी भाजपसह विरोधी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप, रिव्‍हॉल्‍यूशनरी गोवन्‍स (आरजीपी), तृणमूल काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) हे पक्ष उतरले आहेत. निवडणुकीत भाजपने मगोसोबत आणि काँग्रेसने गोवा फॉरवर्डसोबत युती केली आहे. तर, इतर पक्ष स्‍वबळावर निवडणूक लढवत आहेत. या पक्षांचे आणि अपक्ष असे मिळून एकूण २२६ उमेदवार निवडणुकीच्‍या रिंगणात आहेत.

ZP ELection 2025
Goa Nightclub Fire: प्रकृती इतकी गंभीर होती तर विदेशात पळून का गेलात? लुथरांविरोधात सरकारी वकिलांचा युक्तिवाद

दोन्‍ही जिल्‍हा पंचायतींत स्‍पष्‍ट बहुमत मिळेल : दामू नाईक

काही दिवसांत आपण ३० पेक्षा अधिक मतदारसंघांतील उमेदवारांच्‍या प्रचार सभांमध्‍ये सहभाग घेतला. कोपरा बैठका, घरोघरी जाऊन मतदारांच्‍या भेटीगाठी घेतल्‍या. केंद्र आणि राज्‍यातील भाजप सरकारकडून गोव्‍याचा सर्वांगीण विकास होत असल्‍यामुळे मतदारांकडून आपल्‍याला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. त्‍यामुळे गतवेळेप्रमाणेच यावेळीही दोन्‍हीही जिल्‍हा पंचायतींत भाजपला स्‍पष्‍ट बहुमत मिळेल, असा ठाम विश्‍‍वास भाजप प्रदेशाध्‍यक्ष दामू नाईक यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना व्‍यक्त केला.

ZP ELection 2025
Goa Crime: गोव्यातील 16 वर्षीय शाळकरी मुलीवर अपहरण करुन लैंगिक अत्याचार; महाराष्ट्रातील 39 वर्षीय नराधमाचा कोर्टाने फेटाळला जामीन

जनता भाजपला धडा शिकवेल : पाटकर

विविध मतदारसंघांत काँग्रेस–गोवा फॉरवर्ड युतीच्‍या उमेदवारांचा प्रचार करीत असताना भाजप सरकारविरोधातील जनतेतील रोष आम्‍हाला दिसून येत आहे. राज्‍यातील अनेक समस्‍या जैसे थे असल्‍यामुळे जनता सरकारला कंटाळली आहे. त्‍यामुळे गोमंतकीय जनता यावेळी दोन्‍हीही जिल्‍हा पंचायतींत काँग्रेस–फॉरवर्डच्‍या अधिकाधिक उमेदवारांना निवडून देऊन भाजपला धडा शिकवेल, असे काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com