Goa Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत मतदारांमध्ये निरुत्साह!

Goa Zilla Panchayat Election: जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत झालेले मतदान शांततेत झाले, मात्र ही शांतता मतदानावरची उदासिनता स्पष्ट करत होती.
Goa Zilla Panchayat Election
Goa Zilla Panchayat ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Zilla Panchayat Election: सततच्या निवडणुका आणि राजकीय नेत्यांचे पक्षांतर यांना कंटाळलेल्या जनतेने काल जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीत अघोषित बहिष्कार टाकून केवळ 46.66 टक्के मतदान केले. निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 53.34 टक्के मतदारांनी आपला मतदानाच हक्क बजावलाच नाही. काल झालेले मतदान शांततेत झाले, मात्र, ही शांतता मतदानावरची उदासिनता स्पष्ट करत होती.

राज्यातील जिल्हा पंचायतीच्या रेईश मागूश, दवर्ली आणि कुठ्ठाळी या तीन रिक्त जागांसाठी आज पोटनिवडणूक झाली. दवर्ली आणि कुठ्ठाळी येथील सदस्य आमदार झाल्याने आणि रेईश मागूशमधील सदस्याने राजीनामा दिल्याने या जागा रिक्त होत्या. काल सकाळी 8 वाजे पासून सुरू झालेल्या मतदानाला थंड प्रतिसाद मिळाला. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत केवळ 39.90 तर दिवसअखेर केवळ 46.66 टक्के मतदान झाले.

Goa Zilla Panchayat Election
Goa News: तूरडाळ नासाडीप्रकरणी आठ अधिकाऱ्यांची होणार चौकशी!

रेईश-मागूशमध्ये चाैरंगी लढत

रेईश-मागूश मतदारसंघात भाजपचे संदीप बांदोडकर, प्रगती पेडणेकर (काँग्रेस), साईनाथ कोरगांवकर (आरजी) व राजेश दाभोळकर (अपक्ष) अशी चौरंगी लढत झाली. मात्र, मतदानाची टक्केवारी पाहिल्यास सत्ताधारी पक्षासाठी हे जमेची बाजू मानली जात होती. मतदारसंघात एकूण 1,8467 मतदारांपैकी फक्त 6762 जणांनीच मतदान केले. यामध्ये 3656 पुरुष व 3106 महिला मतदारांचा सहभाग होता.

दवर्लीत कार्यकर्त्यांची धावपळ

दवर्ली मतदारसंघात दुपारी 4 वाजेपर्यंत 41.80 टक्के तर कुठ्ठाळी मतदारसंघात 41.29 टक्के मतदान झाले होते. दोन्ही मतदारसंघांत मतदारांची तुरळक संख्याच दिसून येत होती. आपल्या पक्षाचे मतदान वाढावे, यासाठी दवर्ली मतदारसंघात भाजप कार्यकर्ते तर कुठ्ठाळी मतदारसंघात अपक्ष उमेदार मर्सीयाना वाझ यांचे कार्यकर्ते लोकांना बाहेर काढताना दिसत होते. काँग्रेस आणि ‘आप’च्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र सामसूम जाणवत होती.

Goa Zilla Panchayat Election
Goa Politics: मडगावनंतर आता फातोर्ड्याचा कचरा साफ करणार; मुख्यमंत्री सावंतांचं सरदेसाईंवर टीकास्त्र

मंगळवारी निकाल

जिल्हा पंचायतीच्या तीन रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 15 उमेदवार रिंगणात होते. रेईश मागूश येथे 4, कुठ्ठाळी - 4, दवर्ली येथून 7 उमेदवारांचे भवितव्य काल मतपेटीत बंद झाले. यासाठी भाजप, काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि आरजी (RG) पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाली लावली होती. या जागांचा निकाल 18 ऑक्टोबरला मंगळवारी जाहीर होणार आहे.

बार्बोझा यांना अटक

मतदानानंतर काही तासांतच कुठ्ठाळीतील काँग्रेसचे उमेदवार वालेंत बार्बोझा व त्यांचे वडिल जुजे यांना अटक झाली. स्थानिक कपेलचे फादर नाथालियान फर्नांडिस यांना शिवीगाळ, धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. बार्बोजाविरोधात वेर्णा पोलिस स्थानकावर जमाव एकत्र आल्याने रात्री तणाव निर्माण झाला होता.

Goa Zilla Panchayat Election
Goa ZP Election: जिल्‍हा पंचायतीसाठी रेईश-मागूसमध्ये 43.94 टक्के मतदान

सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप-

ही पोटनिवडणूक आहे. त्यात नेहमीपेक्षा कमीच मतदान होत असते. राज्यात सध्या विरोधी पक्ष अस्तित्वातच नाही. झालेले मतदान केवळ भाजपचे आहे. त्यामुळे दवर्लीसह रेईश मागूशवर (BJP) भाजपचाच झेंडा फडकेल. तर कुठ्ठाळीत समर्थक उमेदवार विजयी होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com