Goa Zilla Panchayat Election 2022: जिल्हा पंचायतीच्या '3' जागांसाठी आज मतदान

Goa Zilla Panchayat Election 2022: सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
Goa Zilla Panchayat Election 2022
Goa Zilla Panchayat Election 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Zilla Panchayat Election 2022: फेब्रुवारी महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा पंचायतीच्या तीन जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने सप्टेंबर 21रोजी जाहीर केला. त्यानुसार आज मतदान होणार असून, 18 ऑक्टोबर मंगळवारी मतमोजणी होणार आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी उत्तर गोव्यातील रेईश मागूश, दक्षिण गोव्यातील दवर्ली आणि कुठ्ठाळी अशा तीन जिल्हा पंचायत सदस्य पदाच्या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यात रेईश मागूशचे रूपेश नाईक यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिला होता.

Goa Zilla Panchayat Election 2022
Goa Monsoon: सत्तरीला पुराचा धोका; भीतीमुळे लोकांची उडाली झोप!

तर दवर्लीत उल्हास तुयेकर हे आमदार झाले, तर कुठ्ठाळीत आन्तिनियो वाझ यांनीही राजीनामा देत अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आमदारकी मिळविली होती. या तिन्ही जागांवर पक्ष यश मिळवले, असा भाजपला विश्‍वास आहे. भाजपने कुठ्ठाळीत अपक्ष उमदेवाराला पाठिंबा दिला आहे, तर रेईश मागूशमध्ये नवा चेहरा म्हणून संदीप बांदोडकर यांना उमेदवारी दिली आहे.

पक्षीय पातळीवर होत असलेल्या या निवडणुकीत काँग्रेसने तिन्ही ठिकाणी पक्षाचे उमेदवार उभे केले आहेत. आम आदमी पक्षाने दवर्ली आणि कुठ्ठाळीत उमेदवार दिले आहेत, तर रेईश मागूश येथे अपक्षाला पाठिंबा दिला आहे.

रिव्हॉल्युशनरी गोवन्सने (Revolutionary Goans) अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दर्शविला आहे. दोन्ही जिल्हा पंचायतींत भाजपची सत्ता आहे. या तिन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे. येथील उमदेवारांच्या प्रचाराला खुद्द मुख्यमंत्रीही जाऊन आले आहेत.

रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या तिन्ही मतदारसंघांत आयोगाने जमावबंदी आदेशही लागू केला असून, मद्यविक्रीवरही निर्बंध आणले आहेत. कोविड रुग्णांसाठी सायंकाळी 4 ते 5 हा शेवटचा तास मतदानासाठी ठेवला आहे. रेईश मागूश याठिकाणी ओबीसी, दवर्ली खुल्या आणि कुठ्ठाळीत अनुसूचित जमातीसाठीचे आरक्षण आहे.

Goa Zilla Panchayat Election 2022
Accident: पर्वरी येथे अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

उमेदवारांची यादी

  • रेईश मागूश- (चार उमेदवार): प्रगती संदीप पेडणेकर (काँग्रेस), राजेश वैकुंठ दाभोळकर (अपक्ष-आपचा पाठिंबा), साईनाथ बाबलो कोरगावकर (अपक्ष) आणि संदीप बांदोडकर (भाजप),

  • दक्षिण गोवा (सात उमेदवार): अँड्र्यू रिबेलो (अपक्ष), भगवान रेडकर (अपक्ष), जुझे आग्निलो डायस (अपक्ष), लिओन्सिओ जेर्वासिओ फर्नांडिस (काँग्रेस), मुर्तुझा कुकनूर (अपक्ष), परेश नाईक (भाजप), सिद्धेश भगत (आप),

  • कुठ्ठाळी (चार उमेदवार): जॉन डिसा (आप), लेस्ली आग्नेलो गामा (अपक्ष), मेर्सीना वाझ (अपक्ष), व्हॅलेंट बार्बोझा (काँग्रेस).

मतदारसंघनिहाय पंचायती: रेईश मागूश: रेईश-मागूश, पिळर्ण-मार्रा, नेरूल, सांगोल्डा, दवर्ली: रुमडामळ-दवर्ली, दवर्ली-दिकरपाल, आके-बायश, कुठ्ठाळी: कुठ्ठाळी, केळशी, कासावली-आरोशी-वेळसांव-पाळे-इजोर्शी, चिकोळणा-बागमाळो.

मतदारसंघनिहाय मतदारसंख्या: रेईश मागूश- पुरुष 9,129, महिला 9,338, एकूण 18,467, (एकूण केंद्रे 26). दवर्ली- पुरुष 10,198, महिला 9820, एकूण 20,018 (एकूण केंद्रे 26) कुठ्ठाळी- पुरुष 7,836, महिला 9172, एकूण 17,034 (एकूण केंद्रे 22).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com