Sattari Theft Case: होंडा-सत्तरी चोरीच्या घटनेतील आरोपीला बेड्या; दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

मोबाइल शॉपीचे छत तोडून चोरीचा केल्याचा प्रकार घडला होता.
Sattari Theft Case
Sattari Theft CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Sattari Theft Case होंडा-सत्तरी येथील आनंद चौहान यांच्या मोबाइल शॉपीचे छत तोडून चोरीचा केल्याचा प्रकार घडला होता. चोरट्याने दुकानातील मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रिक उपकरणे लंपास केली होती.

या घटनेतील आरोपीला पकडण्यात आज पोलिसांना यश आले असून अब्दुल मेहबूब गुलील (वय 29 वर्षे, मूळ. रा. कर्नाटक c/o हुसेन रा. गोल्डन बेकरी होंडा, सत्तरी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

Sattari Theft Case
Bailpar Project Pernem: बैलपार जल प्रकल्पामधून आयुष रुग्णालयासह 'या' प्रकल्पांना पाणी पुरवठा; WRDची माहिती

तपासादरम्यान आरोपींकडून मोबाईल फोन आणि उपकरणे असे मिळून 1.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या चोरी प्रकरणात त्याला साथ देणारा त्याचा साथीदार अल्पवयीन असून त्याची रवानगी अपना घर मध्ये करण्यात आली आहे.

या चोरी प्रकरणी भा.दं.वि. अंतर्गत : 44/2023 अन्वये 454, 457, 380 गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर तपास वाळपई पोलीस, सागर एकोस्कर, एसडीपीओ डिचोली यांच्या देखरेखीखाली करण्यात आला असून ASI दत्तात्रय गावस पुढील तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com