बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गोव्यातील व्यक्तीचा उत्तर प्रदेशमध्ये खून, फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Goa Crime News: समीर शेख गेल्या दहा ते १२ दिवसांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी तक्रार देखील कुडचडे पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती.
Goa Man Missing for 12 Days Found Murdered in Uttar Pradesh
Goa Missing person found deadDainik Gomantak
Published on
Updated on

कुडचडे: गेल्या दहा ते बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गोव्यातील व्यक्तीचा गाझीयाबाद, उत्तर प्रदेश येथे खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गाझीयाबाद येथील एका फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, दोघेजण फरार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

समीर शेख (वय ३४, रा. गुड्डामळ, सावर्डे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेख गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी कुडचडे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, आता १२ दिवसांनी शेख यांच्या गाझीयाबाद – उत्तर प्रदेश येथे खून झाल्याचे उघडकीस आले आहे.

Goa Man Missing for 12 Days Found Murdered in Uttar Pradesh
Underage Girls Assault : ईदच्या पार्टीला बोलावून मित्राने घात केला, बर्थडे केक कापून 2 बहिणींसह एका अल्पवयीन मुलीवर दोघांकडून बलात्कार

समीर शेख यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह एका फ्लॅटमध्ये आढळून आला आहे. गाझीयाबाद पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून, दोघेजण अद्याप फरार आहेत. कुडचडे पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक गौतम शेटकर यांच्या नेतृत्वाखालील पथक या घटनेच्या तपासासाठी उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत.

Goa Man Missing for 12 Days Found Murdered in Uttar Pradesh
Goa Road Acident: पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात, राज्यात 5 महिन्यांत 26 जणांचा रस्त्यांवर बळी

शेख यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने गोवा पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, समीर शेख गेल्या दहा ते १२ दिवसांपासून बेपत्ता होते.

याप्रकरणी तक्रार देखील कुडचडे पोलिस स्थानकात दाखल करण्यात आली होती. शेख यांचे अपहरण करुन खून करण्यात आला आहे का? त्यांचा खून का करण्यात आला? याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com