

पणजी: राज्यातील युवकांच्या आगामी विधानसभा नि वडणुकीत काँग्रेस पक्षाकडून काय अपेक्षा आहेत, त्या जाणून घेण्यासाठी ‘युवकांचो सरकार’ हे राज्यभर दारो-दार अभियान सुरू केले जाणार आहे. युवकांच्या अपेक्षांचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश असणार आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अर्चित नाईक यांनी दिली.
काँग्रेस भवनात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रदेश युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव हरगुन सिंग, गोवा प्रभारी स्वप्नील पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी युवक काँग्रेसच्या या अभियानाच्या भित्तीपत्रिकेचेही अनावरण करण्यात आले.
नाईक म्हणाले, राज्यातील बेरोजगार युवकांची संख्या देशात सर्वाधिक आहे. युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत, पण त्यांच्यापर्यंत अमलीपदार्थ पोहोचेले जात आहेत. ग्रामीण भागापर्यंत आता सहजपणे अमलीपदार्थ मिळत आहेत, यावरून पोलिसांचे नियंत्रणच राहिले नाही. महिलांवरील अत्याचाराच्या घटना पाहिल्यानंतर गुन्ह्यांची राजधानी राज्य बनतेय काय, असा प्रश्न पडतो.
पाटील म्हणाले की, गोव्यात प्रत्येक निवडणुकीवेळी युवकांना सरकारी नोकऱ्यांचे गाजर दाखवले जात आहे, त्यांची मते मिळाल्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडले जात आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास युवकांसाठी कौशल्यविकास आणि स्पर्धा परीक्षांसाठी त्यांना तयार करण्यासाठीचे उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.
युवकांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील
युवकांना आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. ज्याचा जनतेशी संपर्क चांगला आहे आणि भाजप उमेदवाराला चांगली लढत देऊ शकतो, अशा युवकाला उमेदवारी देण्यावर आमचा प्रयत्न असेल. काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडे आपण युवकांना बऱ्यापैकी जागा द्याव्यात, जेणेकरून युवक आपली सिद्धता दाखवू शकतात, असे नाईक यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.