Mahadayi Water Issue: राहुल गांधींशी ‘म्हादई’विषयी गोवेकरांची चर्चा

‘म्हादई’च्या विषयावर गोव्यातील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जम्मूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला.
Rahul Gandhi |Mahadayi Water Issue
Rahul Gandhi |Mahadayi Water IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi Water Issue: राज्यात सध्या गाजत असलेल्या ‘म्हादई’च्या विषयावर गोव्यातील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जम्मूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. यात्रेत चालत-चालत त्यांच्याशी ‘म्हादई’ संदर्भात कर्नाटक व गोवा सरकारच्या भूमिकेविषयी चर्चा केली.

दिलीप बोरकर, दिलीप प्रभुदेसाई, दत्ता नायक, मोहनदास लोलयेकर, सत्येंद्र सोनार यांच्यासह ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’त सहभाग घेतला. यात्रेत राहुल यांच्याबरोबर असलेल्‍या जयराम रमेश, दिग्विजय सिंग आणि कन्हैय्या कुमार यांच्याशीही त्‍यांनी चर्चा केली.

वास्‍तव कथन व प्रतिसाद

  • राहुल यांनी साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून म्हादईचा विषय जाणून घेतला. त्याशिवाय त्यांनी काही प्रश्‍नही विचारले.

  • हा प्रश्‍न समन्‍वयातून सोडविता येईल का, याविषयावरही चर्चा झाली. परंतु, गोव्यासाठी हा प्रश्‍न जटील असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्‍यात आले.

  • कर्नाटक सरकार आतापर्यंत गोव्याची फसवणूक करीत आले असून, ते पाण्याची चोरी करीत आहे, हेही त्यांना पटवून देण्यात आले.

  • कर्नाटक सरकार पाणी तंटा लवादाचेही ऐकत नाही, याविषयावर कर्नाटकबरोबर न्यायालयीन लढाईसुद्धा सुरू आहे.

  • कर्नाटकने म्हादईवरील प्रकल्पांद्वारे पाणी वळविल्यास गोव्यातील नद्यांच्या पाण्यातील क्षारता वाढेल आणि त्याचा पर्यावरण, तसेच जनजीवनावर मोठा विपरीत परिणाम होईल, हेदेखील गांधी यांना पटवून देण्यात आले.

Rahul Gandhi |Mahadayi Water Issue
Mahadayi River: म्हादईप्रश्‍नी न्यायालयीन लढा बळकट करण्यावर भर -राजेंद्र केरकर

सोनार यांनी मांडला भटक्या जनावरांचा प्रश्‍न

या यात्रेदरम्यान गोव्यातून सहभागी झालेल्या सत्येंद्र सोनार यांनी देशभरातील भटक्या जनावरांचा व त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचा विषय राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून दिला. गेल्या दहा वर्षांपासून लोकसभेत याबाबतचे खासगी विधेयक प्रलंबित आहे,

त्याविषयी आपण लक्ष घालावे, अशी विनंती सोनार यांनी राहुल यांच्याकडे केली. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यास भटक्या जनावरांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा बसेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Rahul Gandhi |Mahadayi Water Issue
Mahadayi Water Dispute: ‘म्‍हादई’ तरी सारखे म्‍हणा!

भारत जोडो यात्रेचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून गोव्यात म्हादई परिक्रमा यात्रा काढायला हवी. आम्ही राहुल गांधी यांच्याकडे म्हादईचा विषय मांडला आहे. हा विषय गोवा आणि कर्नाटक राज्यांशी संबंधित आहे.

त्यामुळे राजकीय भूमिका घ्यावी, असा प्रश्‍न तुमच्यासमोर असेल, असे त्यांना आम्ही सांगितले. त्यावर त्यांनी याप्रश्‍नी सामंजस्याने हा प्रश्‍न सुटेल काय, अशी विचारणाही केली. त्यावर तसे उत्तर शोधावे लागेल. परंतु गोव्यासमोर हा सध्यातरी मोठा प्रश्‍न असल्याचा विषय त्यांच्याकडे आम्ही मांडला आहे. - दत्ता नायक, साहित्‍यिक, सामाजिक कार्यकर्ते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com