Women Safety In Goa: गोवा महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित! मुख्यमंत्री ठाम, भाडेकरू पडताळणीमुळे गुन्हेगारांवर वचक बसल्याचा दावा

CM Pramod Sawant: गोवा हा महिलांसाठी दिवसेंदिवस असुरक्षित बनत आहे असे आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला त्याला मुख्यमंत्री डॉ. सावंत उत्तर देत होते.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा महिलांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. जरी घटना घडत असल्या तरी त्या त्वरित त्याचा शोध घेऊन कारवाई केली जात आहे. स्थलांतरित लोक अधिकतम गुन्ह्यांमध्ये सामील असतात. भाडेकरूंची पडताळणी सुरू झाल्यापासून गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले लोक आता गोव्यात आश्रय घेऊन राहण्याचे टाळतात. ही मोहीम उपयोगी ठरत आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

गोवा हा महिलांसाठी दिवसेंदिवस असुरक्षित बनत आहे असे आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला त्याला मुख्यमंत्री डॉ. सावंत उत्तर देत होते. पोलिसांनी आतापर्यंत राज्यातील ७० हजार भाडेकरूंची पडताळणी केली आहे त्यामुळे गोव्यात येणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसला आहे.

CM Pramod Sawant
Goa CM Pramod Sawant: गोव्याच्या इतिहासात प्रमोद सावंत यांनी नोंदवला अनोखा विक्रम! मुख्यमंत्रीपदाची सलग सहा वर्षे केली पूर्ण

त्यांची पडताळणीवेळी मागील गुन्हेगारीची माहिती उघड होऊन अडचणीत येऊ याची भीती त्यांना वाटू लागली आहे. औद्योगिक क्षेत्रातील परप्रांतीय मजुरांचीही पडताळणीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यामळे कंत्राटदारांनाही भाडेकरू पडताळणी सुनिश्‍चित करावी लागेल, असे त्यांनी सांगितले.

CM Pramod Sawant
Goa Assembly: प्रत्येक घरात नळ; पण पाणी कुठे? लोक हवालदिल झालेत; फेरेरांचा सरकारला सवाल

महिला सुरक्षितच

महिला काँग्रेसने उपस्थित केलेल्या महिला सुरक्षेबाबतच्या चिंतेचे उत्तर देताना, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितले की गोवा एकट्या प्रवाशांसाठी आणि महिलांसह गटांसाठी सुरक्षित आहे. पोलिस सेवा, हेल्पलाइन आणि पिंक फोर्स कार्यरत आहेत. कोणत्याही वेगळ्या घटना त्वरित आढळून आल्यास तत्परतेने त्याचा शोध घेतल्या गेल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com