देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे गोव्यात (Goa) आहेत असू देत ते पक्षाचा प्रचार करत आहेत. मागिल वेळी देखील गोव्याच्या निवडणुकीवेळी केंद्रात भाजपचेच सरकार होते आणि त्यांचे नेते गोव्यात प्रचाराला आले होते. तरी त्यांना गोव्यात 13 जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसला (Congress)18 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने उशीर केला म्हणून गोव्यात भाजपची सत्ता आली. अशी टीका शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गोव्यातील भाजप सरकारवर केली.
राऊत म्हणाले, गोव्यात सत्तापालट होणार शिवसेनेला मानणारा वर्ग देखील गोव्यात मोठ्या प्रमाणात आहे. काँग्रेसचा पाया देखील गोव्यात भक्कम आहे. मागिल निवडणुकीत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर होते, तरी देखील भाजपला तेथे एकहाती सत्ता मिळविता आली नव्हती. यावेळी गोव्यातील जनतेचा सत्ताधरी भाजपवर रोष आहे. त्यामुळे तेथे नक्कीच सत्ताबदल होईल. 2024 ला आपल्याला देशाचे राजकारण पूर्णपणे बदलेले दिसेल. देश चालविण्यासाठी टीम वर्क लागते. त्यामुळे 2024 च्या आधी तुम्हाला ज्याला आडकावयाचे त्यांना अडकवा, ज्याच्यावर धाड टाकायची त्याच्यावर टाका पण नंतर सत्ता आमचीच असेल. आज देशाचे नेतृत्त्व करण्यास शरद पवार, उध्दव ठाकरे यांच्यासारखे सक्षम नेते या देशात आहेत. असे देखील राऊत यांनी स्पष्ट केले.
दसरा मेळाव्याबाबत बोलताना ते म्हणाले, दसरा मेळावा हा होणारच आहे. भाजप सावरकरांचा वापर करुन घेत आहे. असे सांगत या मेळाव्यात आमच्या आंगावर येणाऱ्यांना आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच मुंबई शिवतिर्थावरच मेळावा करण्याची शिवसैनिकांची इच्छा होती पण कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाही. त्यामुळे सरकार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नियमांचे पालन करण्याचे आदेश सर्वांनाच दिले आहेत. म्हणूनच हा मेळावा षण्मुखानंद हॉल हॉलमध्ये 50 टक्के उपस्थितीत होणार आहे. असे राऊत यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.