शिवसेना (Shivsena) हा फक्त राजकीय पक्ष नसून एक मंत्र आहे. शिवसेना या चार शब्दांमध्ये जी ताकद आहे ती इतर राजकीय पक्षांमध्ये नसल्याचे शिवसेनेचे खासदार तथा गोव्याचे संपर्क नेते संजय राऊत (Goa Shivsena In charge Sanjay Raut) यांनी उपासनगर सांकवाळ येथे गुरुवारी शिवसेना कार्यकर्त्यांच्या सभेत स्पष्ट केले. आम्ही 25 जागा लढविणार आहोत, त्यापैकी चार आमदार विधानसभेत पाठवा आम्ही स्थानिकांना शंभर टक्के नोकऱ्या देण्यासाठी प्रयत्न करू(Job Guarantee), असेही त्यांनी सांगितले. आम्ही जास्तीतजास्त महिलांना उमेदवारी देण्यावर भर देऊ,असे सांगताना त्यांनी कुठ्ठाळी मतदार संघातून शिवसेनेतर्फे भक्ती खडपकर (Shivsena Candidate Bhakti Khadapkar) या उमेदवार असतील, असे जाहीर केले.
याप्रसंगी काहीजणांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राऊत, यांनी त्यांचे स्वागत केले. स्थानिकांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापन केली होती. स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे यासाठी शिवसेनेचे काही आमदार विधानसभेत पाठवा असे राऊत म्हणाले. शिवसेनेचे २२ खासदार आहेत, ही लहान गोष्ट नाही. शिवसेना जे काही ठरवील ते दिल्लीत होते असे त्यांनी स्पष्ट केले. गोव्याला वाचविण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे एक संधी द्या. विधानसभेत शिवसेनेचे आमदार असतील हे लक्ष्य ठेवा, असे आवाहन राऊत यांनी केले.गत विधानसभा निवडणुकीत आम्ही
इतर पक्षाकडे आघाडी केली होती.परंतु, जेथे आमचे कार्य व कार्यकर्ते नव्हते त्या तीन जागा आम्हाला देण्यात आल्या होत्या.आता आम्ही स्वबळावर 25 जागा लढविणार आहोत. कुठ्ठाळी भागात आमचे कार्य असल्याने सदर जागेवर आमचा उमेदवार असेल.आम्ही पक्षाचा विस्तार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.