Goa Waterfalls: धबधब्यांवर जाण्यास बंदी नाही, मात्र पोहण्यास मनाई; आमदार देविया राणे यांचे स्पष्टीकरण

MLA Deviya Rane Waterfall Statement: राणे यांनी स्पष्ट केले की, धबधब्यांवर जाण्यास बंदी घालण्यात आलेली नाही, मात्र पाण्यात उतरणे किंवा पोहण्यासाठी मात्र बंदी असेल.
MLA Deviya Rane Waterfall Statement
MLA Dr. Deviya RaneDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनाने नद्या, ओढे आणि धबधबे भरभरुन वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक भागांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना धबधब्यांवर जाण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

मात्र, यावर आता आमदार देविया राणे यांनी स्पष्टीकरण दिले. राणे यांनी स्पष्ट केले की, धबधब्यांवर (Waterfalls) जाण्यास बंदी घालण्यात आलेली नाही, मात्र पाण्यात उतरणे किंवा पोहण्यासाठी मात्र बंदी असेल. कारण, जोरदार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढलेला असून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

MLA Deviya Rane Waterfall Statement
Waterfall Ban In Goa: सत्तरीतील धबधब्यांवर आता 'नो एंट्री', वनखात्याचा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय

त्या पुढे म्हणाल्या की, "पर्यटकांनी निसर्गाचा आनंद जरुर घ्यावा, मात्र स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपणे ही आपली जबाबदारी आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे."

स्थानिक प्रशासनाने देखील यासंदर्भात सूचना जारी केल्या असून धबधब्याजवळ जाताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात जमीन ओलसर असल्याने घसरण्याचा धोका असतो. काही ठिकाणी जलप्रवाह अचानक वाढतो, ज्यामुळे जीवितहानी होऊ शकते.

MLA Deviya Rane Waterfall Statement
Waterfall Ban In Goa: दक्षिण गोव्यातील सर्व धबधब्यांवर जाण्यास 2 महिने बंदी; नदी, तलावातही पोहण्यास मनाई

सध्या पर्यटकांचा (Tourists) ओढा मोठ्या प्रमाणावर राज्यातील प्रसिद्ध धबधब्यांकडे वाढला आहे. त्यामुळे स्थानिक पोलीस, वनविभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क असून प्रवेश आणि सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com